Ticker

6/Breaking/ticker-posts

जिल्हा बँक निवडणूक : सहमती एक्सप्रेस स्टार्ट

 


अहमदनगर
ः- माजी मंत्री शिवााजीराव कर्डिले हे दिवंगत ज्येष्ठ नेते बाळाासाहेब विखे पा . यांच्या नगरी राजकारणाची उणीव भरून काढीत आहेत . त्यातल्या त्यात जिल्हा बँक निवडणूक अन् कर्डिलेंची भूमिका कायमच राजकीय दृष्ट्या चर्चेत राहिली आहे . आता यावेळी सुद्धा 'सहमती' एक्सप्रेस सुरू करून ते 'किंगमेकर ' च्या पवित्र्यात दिसू लागले आहेत .

निमित्त होते संगमनेरच्या बैठकीचे ,मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काही दिवसांपूर्वी संगमनेरमध्ये घेतलेल्या बैठकीस स्वतः शिवाजीराव कर्डिले, वैभव पिचड, बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर व विवेक कोल्हे असे चौघेजण उपस्थित होते. बँकेच्या राजकारणात पक्षीय भूमिका बाजूला ठेवून सहमतीचा विचार करण्याचे त्यांचे यावेळी ठरले .

याबाबत कर्डिले म्हणाले की , मंत्री थोरात यांनी बोलावल्याने आम्ही त्या बैठकीस गेलो होतो. बँकेच्या आतापर्यंतच्या वाटचालीत भाऊसाहेब थोरात, मारुतराव घुले, काळे, कोल्हे, विखे यांनी पक्षीय राजकारण कधी आणले नाही. शेतकरी व कारखान्यांचे हित नेहमी पाहिले. हीच भूमिका याही वेळी आहे. त्यामुळे आधी अर्ज दाखल करणे तसेच छाननीत काय होते ते पाहून त्यानंतर पुन्हा चर्चा करण्याचे ठरले आहे. त्यामुळे पुन्हा आम्ही भेटणार आहोत, असे ते म्हणाले. 

जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत कर्डिले, प्रा. राम शिंदे व राधाकृष्ण विखे या तिघांची समिती भाजपने केली आहे. येत्या ३० वा ३१ला आमची बैठक होऊन बँकेबाबत आम्ही चर्चा करणार असून, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार आवश्यक तो निर्णय घेणार आहोत. तसेच शेतकरी, कारखाने, कारखान्यांचे कामगार, छोटे व्यावसायिक यांच्या हितासाठी सहमतीची भूमिका आमचीही आहे, असे स्पष्ट करून , 
शिवसेनेचा विषय हा महाविकास आघाडीअंतर्गत असल्याने त्यांचा त्यांनी विचार करावा, असे ते सांगायला विसरले नाही .

दरम्यान,  छाननीत कोणाचे अर्ज राहतात व कोणाचे बाद ठरतात तसेच आणखी किती जागा बिनविरोध होऊ शकतात, यावर या निवडणुकीतील प्रमुख लढती तसेच पक्षीय भूमिका अवलंबून राह्रिल. असे वरकरणी वाटत असले तरी प्रत्यक्षात अर्ज माघारीची गोळा -बेरीज मांडूनच सहमती एक्सप्रेस स्टार्ट झाल्याचे मानले जात आहे .

शेतकरी , सभासदांचे व्यापक हित लक्षात घेऊन एक -दोन वेळेचा अपवाद सोडला तर बँकेत पक्षीय जोडे बासू ला ठेकूनच सह्रमतीचे  राजकारण झाले आहे . हीच परंपरा पुढे चालावी अशी सभासद , शेतकऱ्यांची इच्छा आहे . परंतु गेल्या वेळच्या निवडणूकीपासून गटा-तटाचं राजकारण उफाळून आलं . त्या आधिच्या निवडणूकीत ही सामंजस्याने सुरळीत सर्व काही पार पडलं होतं . या दोन -तीन टर्ममध्ये शिवाजीराव कर्डिलेची भूमिका मह्त्वाची ठरली . किंबहूना किंगमेकरची भूमिका राहिली . आता या वेळीही त्यांनी कंबर कसली आहे . भाजप विरुद्ध आघाडी असा पक्षीय रंग या निवडणूकीला दिला जात असला तरी प्रत्यक्षात मात्री मंत्री राधाकृष्ण विखे विरुद्ध विदयमान मंत्री बाळासाहेब थोरात अशीच रंगणार आहे . या दोन्ही गटात सहमती घडून नव्हे तर घडवून आणण्याची किमया कर्डिले यांना करावी लागेल . यामध्ये सेनेचा सिपड ब्रेकर आडवा आला तर तो लिलया कसा पार करायचा यांचं कौशल्य देखिल त्यांच्याकडं आहे . त्यामुळे दक्षिणेतील चाणक्य असलेले मा . आ . कर्डिले हे दोन्ही गटात कसे मनोमिलन घडवून आणतात व सहमती एक्स्प्रेस कोणत्या दिशेने जाते याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या