Ticker

6/Breaking/ticker-posts

रिक्षा चालकांबाबत काय म्हणाले आ. संग्राम जगताप

 

अहमदनगर लॉकडाऊन काळात हातावर पोट असणार्‍या रिक्षाचालकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्‍न देखील गंभीर झाला होता. त्यावेळी रिक्षा चालकांना मदत मिळण्यासाठी सरकारकडे मागणी करण्यात आली होती. रिक्षाचालकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी नेहमीच शासनस्तरावर पाठपुरावा सुरु असून, शहरातील सर्वच रिक्षा स्टॉप अधिकृत करुन घेणार असल्याचे आ. संग्राम जगताप म्हणाले ..

            भिंगार, आलमगीर, नागरदेवळे येथील प्रवाशांच्या सोयीसाठी स्टेट बँक चौकात आमदार संग्राम जगताप मित्र मंडळ छावणी स्टेट बँक रिक्षा स्टॉपचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. पुढे बोलतांना . जगताप म्हणाले की, शहरालगत असलेले भिंगार, आलमगीर, नागरदेवळे हे परिसर झपाट्याने वाढत आहे.  या भागातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी रिक्षाची गरज लागणार आहे. अनेक वर्षापासून येथे रिक्षाचालक सेवा देत असून, रिक्षांवर अनेक युवकांचा उदरनिर्वाह सुरु आहे. स्टेट बँक चौकात उड्डणपुलाच्या कामाला सुरुवात झाली आहे. हा नॅशनल हायवे झाला असून, या भागात मोठी रहदारी असते. त्यामुळे येथे चांगला स्टॉप असणे गरजेचे आहे.

            यावेळी नगरसेवक गणेश भोसले, मतीन सय्यद, प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, अभिजित खोसे, रिक्षा स्टॉपचे अध्यक्ष अमजत मोमीन, उपाध्यक्ष जहीर सय्यद, सचिव नितीन गायकवाड, माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, विजय गव्हाळे, मुजाहिद सय्यद, अशिष बोंदर्डे, जालिंदर बोरुडे, मतीन ठाकरे, यावेळी रिक्षा स्टॉपचे खजिनदार बेनी अंकल, कार्याध्यक्ष आसिफ शेख, जाफर शेख, दत्ता कुरकुटे, प्रमोद अरुण, नितीन ढवळे, बाळू अल्हाट, नासिर शेख, शहा सरफराज, अरुण शिंदे, सुनील शेळके, अरबाज सय्यद, कुद्दूस शेख, सलीम शेख, आरिफ गुलजार, राजकुमार पालवे आदींसह रिक्षाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या