श्रीगोंदा- कृषी कायद्यावरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दणका दिला असून या कायद्याला स्थगिती दिली आहे. याप्रकरणी तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने चार सदस्यीय समिती नियुक्त केली असून या समितीत शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट यांची नियुक्ती करण्यात आली आहे. घनवट हे श्रीगोंदा तालुक्यातील श्रीगोंदा फॅक्टरी येथील रहिवासी आहेत
अनिल घनवट हे शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेत गेल्या तीस वर्षांपासून सक्रिय काम करत आहेत. शेती आणि शेतीशी निगडित अनेक गोष्टीवर न्याय मिळवण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली आहेत. शेती आणि शेतकरी हित या दोन गोष्टी त्यांच्या कामाच्या केंद्र स्थानी राहिल्या आहेत. इतर अनेक राजकीय पक्षात कामाची संधी असताना शेतकरी संघटनेशी आपली नाळ कायम ठेवली.तालुका स्तरापासून ते राज्य पातळीवर त्यांनी केलेल्या कामाचे या नियुक्तीच्या निमित्ताने चीज झाले असे म्हणावे लागेल.
कृषी कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देत त्यावर तोडगा काढण्यासाठी चार सदस्यांची नियुक्ती केली त्यामध्ये घनवट यांचा समावेश आहे. घनवट यांना कृषी क्षेत्राशी निगडित केंद्रीय पातळीवर काम करण्याची संधी मिळाल्याने तालुक्याच्या वैभवात भर पडली आहे असेच म्हणावे लागेल.
0 टिप्पण्या