Ticker

6/Breaking/ticker-posts

आमचे रक्त खानदानी ; विश्वासघात करणार नाही : - मा.आ.चंद्रशेखर घुले पाटील

         लोकनेता  न्यूज

    (ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

  (प्रशांत गोसावी)

   अ.नगर : आमचं रक्त खानदानी आहे. विखे - घुले कुटुंबाचे पिढ्यानपिढ्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. पद्मश्री (स्व.)विठ्ठलराव विखे पाटील, पद्मभूषण (स्व.) बाळासाहेब विखे पाटील तसेच लोकनेते (स्व.)मारुतराव घुले पाटील यांच्या विचाराचा वारसा दोन्ही कुटुंबाला आहे. .त्यामुळे आम्ही दिलेला शब्द पाळतो. महायुतीचे उमेदवार डॉ. सुजयदादा विखेंना निवडून आणण्याचा शब्द मी उपमुख्यमंत्री अजितदादांना दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ताकदीने खा.डॉ.विखे पाटील यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे राहतील व त्यांना शेवगाव - पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून लीड मिळवून देतील,अशी ग्वाही माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी दिली.     लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अ.नगर येथे पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात श्री.घुले बोलत होते. राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उमेदवार खा.डॉ.सुजयदादा विखे पाटील यावेळी उपस्थित होते.


     लोकसभा निवडणुकीबाबत आपली भूमिका विशद करताना श्री.घुले म्हणाले,यंदाची लोकसभेची निवडणूक वेगळी आहे.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे हात बळकट करण्यासाठी खासदार डॉ.सुजयदादा विखे यांना ताकद देऊन पुन्हा लोकसभेत पाठवायचे आहे .शेवगाव - पाथर्डी विधानसभा मतदारसंघाबाबत बोलताना ते म्हणाले,या मतदार संघाची परिस्थिती वेगळी आहे. येथे लोकप्रतिनिधी वेगळ्या पक्षाचे तर,आम्ही वेगळ्या पक्षाचे आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाचे कार्यकर्ते शेवगाव - पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून भाजपा महायुतीचे उमेदवार डॉ.सुजयदादा विखे यांना लीड देणार आहेत. याबाबत आपण शेवगावला कार्यकर्त्यांची बैठक घेतली आहे.त्यामुळे आमच्याबाबत (घुले बंधू) कोणीही शंका घेऊ नये.


     याप्रसंगी आ.संग्राम जगताप,राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, उपाध्यक्ष नितेश नाहाटा,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा,राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष अनुराधा नागवडे,राजेंद्र नागवडे तसेच अहमदनगर दक्षिणेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .या मेळाव्यामुळे महायुतीत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या