Ticker

6/Breaking/ticker-posts

धनंजय घुले यांची उपशिक्षणाधिकारी पदी निवड

 


  


  

लोकनेता  न्यूज

    (ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

शेवगाव : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेत शेवगाव येथील धनंजय रमेश घुले यांनी घवघवीत यश संपादन केले असून,त्यांची उपशिक्षणाधिकारी पदावर निवड झाली आहे.


ते जलसंपदा विभागातील निवृत्त स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक रमेश घुले यांचे सुपुत्र तसेच सा.बां.खात्यातील निवृत्त कर्मचारी सुरेश घुले यांचे पुतणे आहेत.


     

श्री.घुले यांनी संगणक अभियांत्रिकी ही पदवी संपादन केलेली आहे.सुरुवातीपासूनच त्यांना स्पर्धा परीक्षेचे आकर्षण व आवड होती.जिद्द,चिकाटी व मेहनतीने त्यांनी अभ्यासात सातत्य ठेवले आणि राज्यसेवा परीक्षेत घवघवीत यश संपादन करत उपशिक्षणाधिकारी पदाला गवसणी घातली.त्यांचे ज्येष्ठ बंधू हर्षद घुले बारामती येथे सहाय्यक नगर रचनाकार पदावर तर,धाकटे बंधू चेतन घुले पुणे येथे डसॉल्ट सिस्टम या बहुराष्ट्रीय कंपनीत संगणक अभियंता पदावर सेवेत आहेत.श्री.घुले यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या