Ticker

6/Breaking/ticker-posts

सुवर्णा ढाकणे यांची शिल्प निदेशकपदी नियुक्ती

 


   


 

लोकनेता  न्यूज

    (ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

 शेवगाव : येथील सिव्हिल इंजिनीयर सुवर्णा नवनाथ ढाकणे यांना राज्य शासनाच्या कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अधिपत्याखालील तसेच व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातंर्गत कार्यरत छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) शिल्प निदेशक (प्लंबर) पदावर नियुक्ती मिळाली आहे.


त्या शेवगाव नगर परिषदेचे तांत्रिक सल्लागार सुनील घुले यांच्या पत्नी तर,शेवगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील निवृत्त कर्मचारी सुरेश घुले व जलसंपदा विभागातील निवृत्त स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक रमेश घुले यांच्या स्नुषा तसेच बोधेगाव येथील संघर्षयोद्धा श्री बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक नवनाथ ढाकणे यांच्या सुकन्या आहेत.


त्यांच्या नियुक्तीबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या