Ticker

6/Breaking/ticker-posts

ज्येष्ठ पत्रकार राजेश सटाणकर यांचे निधन

 

लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क 

नगर – येथील ज्येष्ठ पत्रकार व साप्ताहिक सिटी टाइम्सचे संपादक राजेश सदाशिव सटाणकर यांचे आज दि. १३ रोजी पुणे येथे दु:खद निधन झाले. मृत्यू समयी ते ६५ वर्षांचे होते. त्यांच्यावर रात्री उशिरा नगरमध्ये नालेगांव, अमरधाम स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सून, नातू असा परिवार आहे.


ते गेल्या 40 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत होते. गावकरी, लोकयुग, पुण्यनगरी आदि दैनिकात पत्रकार म्हणून त्यांनी काम केले. त्याचबरोबर त्यांनी स्वत:चे साप्ताहिक सिटी टाइम्स याची धुरासुद्धा 30 वर्षांहून अधिक काळ सांभाळली. साप्ताहिकाच्या माध्यमातून लिखानाबरोबरच अनेक सामाजिक, धार्मिक विशेषांक त्यांनी प्रसिद्ध केले होते. 


त्यांच्या लिखानाबद्दल त्यांना अहमदनगर प्रेस क्लबचा स्व. भास्करराव डिक्कर जीवन गौरव पुरस्कार, औरंगाबाद येथील बियाणी प्रतिष्ठानाचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार व अनेक सन्मान मिळाले होते. त्याचबरोबर अनेक सामाजिक संघटनांबरोबर ते काम करत होते. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या