Ticker

6/Breaking/ticker-posts

राजकीय घडामोडींचा जनतेला आला उबग ; मात्र ॲड. ढाकणे यांच्या झंझावाती अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद..

 

खंबीर साथ देण्याची सर्वसामान्यांची ग्वाही




लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 पाथर्डी  : (विक्रम केदार) राष्ट्रवादी  काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक ॲड. प्रतापराव ढाकणे यांनी सुरू केलेल्या गाव चलो.. घर चलो अभियानास पाथर्डी -शेवगाव तालुक्यातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. एकीकडे राज्यातील राजकीय घडामोडींचा उबग आला आहे. मात्र त्याच वेळी ॲड. ढाकणे यांच्या या अभियानास मिळणारा सर्व सामान्यांचा पाठिंबा लक्षवेधी ठरत आहे.



७ ऑगस्ट पासून सुरू झालेल्या  या अभियानात पाथर्डी तालुक्यातील टाकळीमानुर तांबेवाडी गाढेवाडी मंचरवाडी चोळी अंबिका नगर भागाचा दौरा ढाकणे यांनी केला. या दौऱ्यात राजकीय परिस्थिती संदर्भात जनतेच्या मनात प्रचंड  संताप व्यक्त केला जातोय मात्र गेल्या पंचवीस वर्षापासून विधानसभेच्या तीन निवडणुकीत पराभूत होऊनही जनतेच्या प्रश्नासंदर्भात काम करत असल्याने आगामी काळात   ढाकणे यांना साथ देण्याच्या भावना नागरिकात व्यक्त केली जात आहे छोटे व्यवसायिक छोटे दुकानदार पान स्टॉल सायकल मार्ट सेतू सुविधा केंद्र ऊस तोडणी मजूर  लहान युवकाशी मुक्त संवाद साधत त्यांच्या प्रश्नाची जाणीव करून घेत मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जात आहे 



टाकळीमानव येथील गरीब कुटुंबातील पतीचे निधन झालेल्या अशा महिला विमान झेंड यांनी आपली कैफियत मांडत संजय गांधी निराधार योजनेतून लाभ सुरू करण्याची विनंती केली असता तत्काळ पाथर्डी तहसीलदारांचे प्रतापराव  ढाकणे यांनी भ्रमणध्वनी भारी संवाद करत प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली टाकळीमानुर गावात तांबेवाडी वाडी वस्तीवर जात जिल्हा परिषद शाळेतील दुसरी तिसरीच्या विद्यार्थ्यांचे संवाद साधत साहेब बनण्यासाठी अभ्यास करा अभ्यास केला नाही तर पारंपारिक ऊस तोडणी जावे लागेल याची जाणीव करून देत विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याचा सल्ला दिला ठोंबरे वस्ती येथे हरिनाम सप्ताह ढाकणे यांनी फुगडी खेळताना दिलेली शिकवण आत्मसात केल्यास जीवनात आनंद मिळतो याची जाणीव करून दिली संतांनी तुमच्या माझ्यासाठी कल्याणसाठी आयुष्य जुळले आहे .

चुंबळी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे निरीक्षण सुमारे 2016 रोजी झाले असून ती इमारत पाडली आहे. मंदिरात जिल्हा परिषदेची शाळा भरली जात आहे याची माहिती ग्रामस्थांनी दिली असता त्वरित भ्रमण दूरध्वनीद्वारे गटविकास अधिकारी जगदीश पाटील यांच्याशी संपर्क करत त्या विषयावर चर्चा केली.


 यावेळी माजी सभापती गहिनीनाथ शिरसाठ , राजेंद्र नागरे , राजेंद्र गाडे ,भीमराव फुले , लक्ष्मण ठोंबरे , पिराजी शिरसाठ दादासाहेब बारगजे अमोल गाडे बाबासाहेब ढाकणे सुरेश बांगर शहादेव शिरसाठ , लक्ष्मण बडे , सोपान मंचरे बाळू खेडकर मच्छिंद्र मानकर नानासाहेब ढाकणे अण्णासाहेब शिरसाठ बीके ढाकणे शिरसाट पी यु विक्रम केदार आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या