मुंबई ः मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यातील बहुतांशी भागात दहिहंडी उत्सव व गोविंदा प्री लीग स्पर्धा मौइया प्रमाणात अयोजित करण्यात येतात, या पार्श्वभूमीवर राज्यातील गोविंदा पथकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केलेली विमा संरक्षणाची मागणी तत्काळ मंजूर करण्यात आली आहे. याबाबत राज्य सरकारने ५० हजार गोविंदांना विमा संरक्षण देण्याची मागणी मान्य केली आहे. तसा शासन निर्णय राज्याच्याक्रीडा विभत्तगकडून नुकताच जारी करण्यात आला आहे.
मुंबई ठाण्यासह राज्यातील अनेक भागात दहिहंडी व गोविंदा प्री लीग स्पर्धा मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात येतात. या उत्सवात हजारोंच्या संख्येने गोविंदा आणि गोपिका सहभागी होतात. दहिहंडी हा साहसी खेळ असल्यामुळे अनेक वेळा तो खेळतांना मनोरे ढासळून अपघात होतात. अपघातात जखमी, गंभीर जखमी होण्याचे प्रमाण मोठे असते. प्रसंगी हा खेळ जीवावरही बेततो. त्यामुळे या गोविंदांना विमा संरक्षण देण्याची अनेक वर्षापासून मागणी होती. याबाबत मुंबई, ठाण्यातील गोविंदा पथकांनी ११ जुलै रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. त्या अनुषंगाने गोविंदांना १० लाखांपर्यत संरक्षण देण्याच्या निर्णय शासनाने नुकताच जाहीर केला आहे.
शासनाच्या या निर्णयामुळे दहिहंडीच्या वेळी गोविंदांना अपघात झाल्यास त्यांना दोन अवयव किंवा डोळे गमवावे लागल्यास किंवा मृत्यू ओढवल्यास त्यांच्या कुटूंबियांना १० लाखांपर्यंत मदत मिळणार आहे. एक हात , एक पाय, किंवा एक डोळा गमावल्यास ५ लाख रूपये तर कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास १० लाख किंवा अंशतः अपंगत्व आल्यास टक्केवारीच्या प्रमाणात मदत दिली जाणार आहे, या निर्णयामुळे गोंविंदाना दिलासा मिळाला आहे. या निर्णयाबद्दल गोविंदा पथकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व क्रीडामंत्री संजय बनसोडे यांचे आभार मानल आहेत.
0 टिप्पण्या