Ticker

6/Breaking/ticker-posts

शब्दगंधच्या राज्यस्तरीय खुल्या कथालेखन स्पर्धेत वैभव रोडी प्रथम तर डॉ. शैलजा करोडे द्वितीय

 लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)  




नगर– “शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने पंधराव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित राज्यस्तरीय खुल्या कथालेखन स्पर्धेमध्ये ६२ नवोदित कथाकारांनी सहभाग नोंदवला होता, यामध्ये 'झालंर' ,वैभव रोडे, शेवगाव प्रथम , 'असे हि रक्षाबंधन '  डॉ. शैलजा करोडे, नवी मुंबई द्वितीय तर ' ध्येयवेडा ' सुजित फलके, सोयगाव जि. औरंगाबाद,तृतीय यांना  पारितोषीक जाहिर करण्यात येतं आहेत.” अशी माहिती कथालेखन स्पर्धा प्रमुख बबनराव गिरी यांनी दिली. 



           पारितोषिक प्राप्त साहित्यिकांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र,पुस्तकं व साहित्य संमेलनात सहभाग मिळणार असून उत्तेजनार्थ पारितोषिके रामकृष्ण आघोर,सोलापूर, सुधीर फडके व पी.एन.डफळ, नगर यांना देण्यात येणार आहेत.पंधराव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनात पुरस्कार वितरण होणार असल्याची माहिती खजिनदार भगवान राऊत यांनी दिली.

        स्पर्धेचे परीक्षण शाहिर भारत गाडेकर,सुनील धस व शर्मिला गोसावी यांनी केले.पारितोषीक प्राप्त साहित्यिकांचे अध्यक्ष राजेंद्र उदागे,संस्थापक सुनील गोसावी, ज्ञानदेव पांडूळे, प्रा.डॉ.अशोक कानडे, सुभाष सोनवणे यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या