Ticker

6/Breaking/ticker-posts

शेतकऱ्याची मुलगी मनिषा खेडकर झाली पी. एस. आय. !

 









लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)  


टाकळीमानुर (विक्रम केदार) :

पाथर्डी तालुक्यातील टाकळी मानूर येथून सुमारे दोन किलोमीटर असणाऱ्या चुंबळी या छोट्याशा खेड्यामध्ये शेतकऱ्यांची मुलगी कु. मनीषा आश्रुबा खेडकर हिची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे.


महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये कु. मनीषा खेडकर हिची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे प्राथमिक शिक्षण चुंबळी येथे तर माध्यमिक श्री भवानी माता माध्यमिक विद्यालय, टाकळीमानुर येथे आणि कृषीपदवी राहुरी कृषी विद्यापीठाचे अंतर्गत कृषी महाविद्यालय धुळे येथे एम एस सी ऍग्री पूर्ण करून कुठलेही क्लासेस न करता घरीच अभ्यास करत पोलीस उपनिरीक्षकपदी एका शेतकऱ्याच्या मुलीची निवड झाली.

 

 या निवडीबद्दल तिचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ॲड. प्रतापराव ढाकणे, केदारेश्वरचे अध्यक्ष ऋषिकेश ढाकणे, अभय आव्हाड, गहिनीनाथ शिरसाट ,बाबासाहेब ढाकणे, डॉ. विजय किसवे ,आप्पासाहेब शिरसाठ, शहादेव शिरसाठ, भिवशेन खेडकर, दिलीप शहाणे, बप्पासाहेब शिरसाट, पोपटराव शिरसाठ आदींनी अभिनंदन केले आहे.


जिद्द, चिकाटी आणि मेहनतिचे यश

लोकनेताशी बोलताना मनीषा खेडकर म्हणाल्या की, जिद्द, चिकाटी आणि मेहनत या त्रिसुत्रीचा अवलंब केल्यास यश हमखास मिळते. पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांचे मला वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले. मुलींनी असेच मिळवावे, असे आवाहन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या