Ticker

6/Breaking/ticker-posts

पहिला 'हेल्थकेअर लीडरशिप' पुरस्कार खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना प्रदान

 ‘रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल’ चा राष्ट्रीय डॉक्टर्स डे निमित्त उपक्रम 



लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)  

 नगर, “राष्ट्रीय डॉक्टर्स दिनाच्या” औचित्याने अहमदनगर येथे आयोजित कार्यक्रमांमध्ये ‘रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल’ च्या वतीने नामवंत “हेल्थकेअर लीडरशिप पुरस्कार” न्यूरोसर्जन, खासदार  डॉ. सुजय विखे पाटील यांना प्रदान करण्यात आला. 



खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यातील पहिले अवयव प्रत्यारोपण केंद्र सुरू करून मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये उपलब्ध असलेली ही महागडी सुविधा अहमदनगर सारख्या शहरांमध्ये गोर-गरिबांना परवडेल अशा दरामध्ये उपलब्ध करून दिले. 200 खाटाचे ‘डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर’ यशस्वीरित्या चालवून अनेक जणांचे जीव वाचविले आहेत. केंद्र शासनाची वयोवृद्ध रुग्णासाठी असलेली ‘राष्ट्रीय वयोश्री योजना’ राबविताना लाभार्थ्याच्या संख्येमध्ये उच्चांक गाठल्याबद्दल देशाचे आदरणीय पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्यातर्फे विशेष प्रशस्तीपत्र देण्यात आले आहे. हृदयरोग-शस्त्रक्रिया, अँजिओप्लास्टी, कर्करोग, सांधे-बदल, मेंदू व मूत्रपिंडाच्या शस्त्रक्रिया अशा अनेक आरोग्य सुविधा मोफत किंवा सवलतीच्या दरामध्ये गोर-गरिबांसाठी उपलब्ध करून दिले आहे. 

आरोग्य शिबिराच्या माध्यमातून विविध आरोग्य सेवा जनतेच्या दारापर्यंत पोचवले तसेच कोरोना महामारीच्या काळात मोफत प्रसुती डॉ विखे पाटील हॉस्पिटलच्या माध्यमातून करून अनेकांना आधार दिला. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन  त्यांना 2023 चा पहिला ‘हेल्थकेअर लीडरशिप अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला आहे.

डॉ. अभिजीत दिवटे, वैद्यकीय संचालक, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन यांना 2023 चा “हेल्थकेअर एक्सलन्स पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले. डॉ. दिवटे यांनी आरोग्य सेवेतील ‘मनुष्यबळ’ आणि आरोग्य सुविधांचा ‘दर्जा’ वाढविण्यासाठी केलेल्या ‘उत्कृष्ट’ योगदानाबद्दल त्यांना पुरस्कार देण्यात आला. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने ‘महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस, नाशिक’ द्वारे घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये ‘नाशिक’ विभागातील सर्वोत्तम मेडिकल कॉलेजचे पुरस्कार मिळवून अहमदनगरचे बहुमान वाढविले आहे.

तसेच डॉ. सुनील म्हस्के, अधिष्ठाता, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन चे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांना ‘वैद्यकीय शिक्षण व सर्वांगीण आरोग्य सुविधा प्रभावीपणे राबविल्याबद्दल “सर्वोत्तम प्रशासक” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील  डॉ. विनोद चिंधे-कार्डियाक सर्जन, डॉ. ओंकार थोपटे-कार्डिओलॉजिस्ट, डॉ. साईप्रसाद शिंदे व डॉ. शरद गारुडकर-नेफरोलॉजिस्ट, डॉ. अभिजीत आवारी, डॉ. अवनी कुमार श्रीवास्तव, डॉ. विजय पाटील, डॉ. सतीश मोरे इत्यादींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण ‘रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल’ चे नवनिर्वाचित अध्यक्ष श्रीयुत’ हरीश नय्यर यांनी केले तर आभार प्रदर्शन नवनिर्वाचित सचिव डॉ. कुणाल कोल्हे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी पुण्यासाठी रोटरी क्लबच्या अनेक सदस्याने खूप मेहनत घेतली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या