Ticker

6/Breaking/ticker-posts

भारतीय वायुदलात प्रसाद बडे यांची फायटरपदी निवड



राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस  प्रतापराव ढाकणे यांच्या हस्ते बडेंचा गौरव  (छाया: विक्रम केदार)

लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

टाकळीमानुर: भविष्यात आपले क्षेत्र निवडताना मानसिक गोंधळ निर्माण होऊ न देता आपले धोरण निश्चित जिद्दीने व कष्टाने त्या दिशेने मार्गक्रमण केल्यास यश निश्चित प्राप्त होते, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ॲड. प्रतापराव ढाकणे यांनी केले.


पाथर्डी तालुक्यातील भिलवडे येथील प्रसाद दिनकर बडे यांची भारतीय वायुदलात हायर फायटर म्हणून निवड झाल्याबद्दल आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी विश्वस्त श्रीकांत निराळी, पंडितराव बडे, दिनकर बडे आदी मान्यवर उपस्थित होते.


 पुढे बोलताना ढाकणे म्हणाले की, पाथर्डी तालुका पूर्वी दुष्काळी भाग म्हणून ओळखला जायचा. आज मात्र तालुक्याची ओळख महाराष्ट्रात नोकरदारांचा तालुका म्हणून  होत आहे . मुले -मुली अतिशय कष्ट घेतात, कठोर परिश्रम व प्रतिकूल परिस्थितीवर मात करून कष्ट केल्यास  छोट्या गावातून प्रसाद बडेची  भारतीय वायुदलात फायर फायटर म्हणून झालेली निवड  तालुक्याच्या दृष्टीने अभिमानाची प आहे .असेच तरुण तरुणांना मार्गदर्शन करावे. जीवनामध्ये आई-वडिलांचे  संस्कार  अतिशय महत्त्वाचे असतात. त्यांनी ठरवून दिलेल्या दिशेने वाटचाल सुरू ठेवल्यास यश निश्चित मिळते ,असे ते म्हणाले.


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या