लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
पाथर्डी (टाकळीमानुर) : - दि. १८ सप्टेंबर
पाथर्डी तालुक्यातील टाकळीमानुर येथील प्रतिष्ठित व्यापारी दिवंगत रमेशलाल मिस्त्रीलाल मंडलेचा यांचं अल्पशा आजाराने निधन झाल्याने संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष एडवोकेट प्रतापराव ढाकणे यांनी आज त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
रमेशलाल हे नगर अर्बन बँकेचे माजी उपाध्यक्ष विजयकुमार मंडलेचा यांचे मोठे बंधू होत. ढाकणे यांनी मंड लेचा कुटुंबाची भेट घेत त्यांना या दुःखातून सावरण्यासाठी सुमारे दोन तास थांबून त्यांना आधार दिला. दिवंगत पंतप्रधान चंद्रशेखर मंत्रिमंडळामध्ये तत्कालीन ऊर्जा मंत्री बबनरावजी ढाकणे यांनी दिल्ली येथे महाराष्ट्रातील किसानांची पंतप्रधान चंद्रशेखर यांची भेट घडून आणली होती त्यावेळी स्व. रमेशलाल मंडलेचा त्या शिष्टमंडळामध्ये होते. माजी मंत्री बबनरावजी ढाकणे साहेब व संघर्ष योद्धा केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतापकाका ढाकणे यांचे ते अत्यंत निकटवर्तीय होते.
ॲड. ढाकणे यांच्या समवेत राजेंद्र नागरे, सहादेव शिरसाठ, मच्छिंद्र मानकर, अमोल गाडे , राजेंद्र गाडे, अजित शिरसाठ ,महावीर मुनोत, खेडकर, विक्रम केदार ,दादासाहेब बारगजे , बि.के. ढाकणे, राजेंद्र शिरसाठ आदी मान्यवर उपस्थित होते.
वयोवृध्द माणिकराव शिरसाट यांचीही घेतली सदिच्छा भेट
जुन्या पिढीतील कार्यकर्ते माणिकराव विठ्ठलराव शिरसाट वयोवृद्ध झाल्याने प्रतापकाका ढाकणे यांनी त्यांचीही भेट घेतली. तसेच कृषी सहाय्यक जगदीश सुरेश शिरसाट यांच्या कडे चहापानासाठी गेले असता ॲड. प्रतापकाका ढाकणे यांचा शहादेव शिरसाठ यांनी शाल ,श्रीफळ देऊन सत्कार केला.
0 टिप्पण्या