Ticker

6/Breaking/ticker-posts

साई चरणी भाविकाने केले सुवर्णपुष्प अर्पण

 









लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)  

शिर्डी : दिं . १४

शिर्डीत साईबाबांचे चरणी प्रत्येक वेळी अनोखे दान करण्याची कायमच परंपर आहे. अनोखे दान साई चरणी करत हैदराबाद येथील एका भाविकाने तीन सुवर्ण पुष्प अर्पण  केले. 

     


                  

 साईबाबांवर नितांत श्रद्धा ठेवणारे भाविक केवळ साई सेवा म्हणून नानाप्रकारे सेवा करण्याचे अनुभव आहेत. त्यामध्ये काही भक्त अन्नदान करतात. तर काही भक्त साई संस्थानच्या रुग्णालयात यंत्रसामुग्री देऊन सेवा करतात. काही जण मंदिरात विद्युत रोषणाई करतात. तर काही जण मंदिरात फुल सजावट करतात. साई चरणी यापूर्वी कितीतरी वेळेला सिंहासन, ताट वाटी, पाण्याची झारी आणि कितीतरी वेळेला सुवर्ण मुकुट साई चरणी अर्पण केलेल्या आहेत.  


अशीच सेवा हैदराबाद येथील भाविक एम. राजेंद्र रेड्डी यांनी २१४. ४५ ग्रॅम वजनाचे ९ लाख ९८ हजारांचे तीन नग असे सुवर्ण पुष्प दानात दिले आहे. ही देणगी साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्रीबानायत, मुख्यलेखाशाखाधिकारी कैलास खराडे, मंदिर प्रमुख रमेश चौधरी आदीसह साईभक्त उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या