Ticker

6/Breaking/ticker-posts

आदर्श जीवन जगण्याचा वस्तुपाठ घुले महाराजांनी घालून दिला-प्रतापराव ढाकणे

 

















लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)    


टाकळीमानूर :-कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन हे तरुण पिढीला आत्मसात करण्याची नितांत आवश्यकता आहे, विठ्ठल महाराज घुले यांनी आपल्या संपूर्ण जीवनात  संतांच्या विचारावर आधारित जीवन कसे जगावे, याचा वस्तुपाठ  सर्वांना घालून दिला, त्याच आधारावर आपण आपलं जीवन कार्य व्यवस्थितपणे केले पाहिजे, तीच  महाराजांना आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अॅड. प्रतापराव ढाकणे यांनी केले.


पाथर्डी तालुक्यातील कोळसांगी येथे विठ्ठल महाराज घुले यांच्या बाराव्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी ह. भ. प. आदिनाथ महाराज , सभापती सुनीता दौंड, शिवशंकर राजळे, बापूसाहेब भोसले वारकरी संप्रदायामध्ये अनिष्ट रूढी आणि परंपरा यांना कोठेही थारा देत नाही, देव माणसात आहे म्हणून माणुसकी धर्म जोपासावा हीच खऱ्या अर्थाने संतांची शिकवण आहे. पाथर्डी तालुका ऊस तोडणी कामगारांबरोबरच संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. राष्ट्रीय संत आनंद ऋषीजी महाराज, राष्ट्रीय संत तनपुरे महाराज, नाथ संप्रदाय, संत भगवान बाबा, संत वामनभाऊ महाराज मोहटयाची जगदंबा देवी, मढी आदी संत देवस्थान आहेत, असेही ढाकणे यांनी सांगितले. 

 
यावेळी आदिनाथ महाराज यांनी कीर्तनाच्या आपल्या मधुर वाणीतून समाज प्रबोधन करताना संत विचार संत संगत आपल्या जीवनामध्ये बदल घडू शकते महाराष्ट्रात संत परंपरेची पताका वाढविण्याचे काम विठ्ठल महाराज घुले यांनी केले यातूनच विविध ठिकाणी आज त्यांची पुण्यतिथी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे.


यावेळी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्या शिबिराचे दीप प्रज्वलन आदिनाथ महाराज, प्रतापराव ढाकणे, सुनीता दौंड, शिवशंकर राजळे बापूसाहेब भोसले यांच्या हस्ते करण्यात आले व यांना श्री विठ्ठल महाराज घुले यांची प्रतिमा भेट देण्यात आली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या