Ticker

6/Breaking/ticker-posts

"दि बर्निंग पॉवर ट्रान्सफार्मर" घोटण वीज उपकेंद्राच्या पॉवर. ट्रान्सफार्मरला भीषण आग ..!

लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 


    

शेवगाव :- शेवगाव - पैठण राज्य मार्गावरील घोटण, (ता.शेवगाव) येथील वीज वितरण कंपनीच्या 33 केव्हीए क्षमतेच्या उपकेंद्रातील 5 एमव्हीए पॉवर ट्रान्सफार्मरला आज बुधवारी (दिं 28 रोजी) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास मोठी आग लागली. 


आग विझविण्यासाठी पाथर्डी नगर परिषद व नजीक बाभूळगावच्या गंगामाई शुगर कारखान्याचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले असून ती विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली ? तसेच आगीमुळे किती नुकसान झाले ? याचा तपशील अद्याप समजू शकला नाही. 


आग व धुराचे प्रचंड लोट उपकेंद्राच्या परिसरात आहेत . याबाबतच्या वृत्ताला वीज वितरण कंपनीचे शेवगावचे उप अभियंता एस.एम.लोहारे यांनी दुजोरा दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या