Ticker

6/Breaking/ticker-posts

१६ सप्टेंबरला नगर जिल्हात श्री तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे आगमन

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

नगर- नगरमधील सबजेल चौकातील  पलंगे कुटुंब मानकरी असलेल्या व सुमारे ८०० वर्षाची परंपरा असलेल्या श्री तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे आगमन १६ सप्टेंबरला नगर जिलह्यात होणार आहे.

 

शाम पांडे ,नगराध्यक्ष जुन्नर शहर यांनी पलंगाचे दर्शन घेऊन पूजा केली. श्री तुळजाभवानी मातेचा पलंग ५ जिल्हे (पुणे,अहमदनगर,बीड,सोलापूरउस्मानाबाद) फिरून तुळजापूर मध्ये पोहोचतो. पुणे प्रवास घोडेगाव,निमदरी,जुन्नर,कुमशेत,हापुसबाग,नारायणगाव,आळे,राजुरी करून अहमदनगर जिल्हा पलंगाचा प्रवास सुरु होणार आहे.  या पलंगाचा मुक्काम व पलंगाचा प्रवास अंतर कंसात दिले आहे,राजुरी ते अळकुटी(१दिवस मुक्काम दुसऱ्या दिवशी प्रस्थान,प्रवास १६ किमी),अळकुटी ते वडझिरे(१ दिवस मुक्काम दुसऱ्या दिवशी प्रस्थान प्रवास १३ किमी), वडझिरे ते पारनेर(१ दिवस मुक्काम दुसऱ्या दिवशी प्रस्थान,प्रवास २५ किमी),पारनेर ते कान्हूर पठार(१ दिवस मुक्काम दुसऱ्या दिवशी प्रस्थान,प्रवास १३ किमी),कान्हूर पठार ते किन्ही(१ दिवस मुक्काम दुसऱ्या दिवशी प्रस्थान,प्रवास ७ किमी),किन्ही ते गोरेगाव(१ दिवस मुक्काम दुसऱ्या दिवशी प्रस्थान,प्रवास ६ किमी)गोरेगाव ते टाकळी खातगाव(१ दिवस मुक्काम दुसऱ्या दिवशी प्रस्थान,प्रवास २० किमी)टाकळी खातगाव ते भूतकरवाडी ताठेमळा(१ दिवस मुक्काम दुसऱ्या दिवशी प्रस्थान,प्रवास १९ किमी),ताठेमळा ते नालेगाव(१ दिवस मुक्काम दुसऱ्या दिवशी प्रस्थानप्रवास ५ किमी.),नालेगाव ते सबजेल चौक अहमदनगर(१ दिवस मुक्काम दुसऱ्या दिवशी प्रस्थान प्रवास १० किमी),सबजेल चौक ते कलेक्टर ऑफिस चौक अहमदनगर( १ दिवस मुक्काम दुसऱ्या दिवशी प्रस्थान,प्रवास ५ किमी.)

पुणे जिल्हा ते अहमदनगर जिल्हा या मधले मुक्कामाचे आणि मधले सर्व विसाव्याचे गाव धरून श्री तुळजाभवानी मातेचा पलंग ३९ दिवस २२० किलोमीटर प्रवास करून नवरात्रीच्या तिसऱ्या माळेला भिंगारला पोहोचतो भिंगारला रात्री ११ ते १२ च्या दरम्यान श्री तुळजाभवानी मातेच्या सीमोल्लंघन पालखीची आणि श्री तुळजाभवानी मातेच्या श्रमनिद्रा पलंगाची ऐतिहासिक भेट मारुती मंदिर येथे पार पडते.

 

श्री तुळजाभवानी मातेचा पलंग खांद्यावर डोक्यावर वाहून पायी तुळजापूरला नेण्याची परंपरा आहे. नगरमधून श्री तुळजाभवानी मातेचा पलंग बीड जिल्हा,सोलापूर जिल्हा आणि उस्मानाबाद जिल्हा असा नवरात्रीची तिसरी माळ ते नवरात्राची नववी माळ अशी ७ दिवस २४ तास म्हणजे दिवस-रात्र प्रवास करत असतो.नगरलगत असणारी लोणी सय्यदमीरकुंटेफळचिंचोडी पाटील,कुंडी या चार मानाच्या गावचे भक्त पलंगासोबत सेवा करण्याचे काम करत असतात.

बीड जिल्हा,सोलापूर जिल्हा आणि उस्मानाबाद जिल्हा प्रवास पुढे ७ दिवसांमध्ये पलंगाचा प्रवास मार्ग निमोडीसारोळालोणी सय्यदमीरकुंटेफळचिंचोडी पाटीलकुंडीधानोराकडाआष्टीपांढरीजामखेडखर्डाभूमओरसालीआगळगावबाभळगाव (ता. बार्शी), दगडधानोराघारीपुरीकारिनारीझरेगावबोरगावहून चिलवडी (ता.उस्मानाबाद), आपसिंगा आणि दसऱ्याच्या आधल्या दिवशी तुळजापुरातील मोतीझरा येथे सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पोहोचतो.  असा २२० किलोमीटर प्रवास फक्त ७ दिवसात हा तुळजाभवानी मातेचा श्रमनिद्रा पलंग प्रवास करून श्री क्षेत्र तुळजापूर मध्ये पोहोचतो.


घोडेगावपासून श्री क्षेत्र तुळजापुरात पलंग पोहोचायला तब्बल ४६ दिवस लागतात.म्हणजे घोडेगाव ते अहमदनगर असा प्रवास करायला ३९ दिवस लागून सर्व प्रवास हा २२० किलोमीटर असतो. तर नवरात्र तिसरी माळ ते नवरात्र नववी माळ असे ७ दिवस लागून पुढील २२० किलोमीटर प्रवास दिवस रात्र करत असतो.हे खूप विचार करायला आणि थक्क करणार आहे.

ज्या प्रमाणे नवरात्रात ९ दिवस देवी महिषासुराशी युद्ध करते आणि जिकल्यानंतर श्रम जाण्यासाठी देवी श्रमनिद्रा घेते तसाच हा श्रमनिद्रा पलंग ७ दिवस रात्र दिवस पायी चालत असतो आणि देवीच्या श्रमनिद्रा साठी तुळजापुरात पोहोचतो.शेकडो वर्षांपासूनची ही परंपरा आजही तशीच सुरू आहे. प्रपंचाची पर्वा न करता धर्मासाठी राबणारे हात अजूनही शिल्लक आहेत

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या