Ticker

6/Breaking/ticker-posts

आमदाराना सरकारची तर , प्रशासनाला बदल्यांची चिंता, आता बदल्यांचे काय होणार?

 








लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 अहमदनगर : दि. २३ जून २०२२- सध्याच्या राजकीय परिस्थितीचा निर्णय काय होणार? हे सरकार टिकणार की नवीन येणार? ते कोणाचे येणार ? याबद्दल उत्सुकता दाटली असतानाच प्रशासन मात्र वेगळयाच चिंतेत सापडले आहे. ती म्हणजे स्थगित करण्यात आलेल्या बदल्यांच्या बाबतीत काय निर्णय होणार. दुपारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सर्व विभागांच्या सचिवांची बैठक घेणार आहेत. त्यामध्ये काही निर्णय होतो का? याकडे लक्ष लागले आहे.

 

राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकांच्या अनुषगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २८ मे रोजी एका आदेशाने बदल्यांना मनाई केली होती. ३० जूनपर्यंत राज्य सरकारी सेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय केल्या जाऊ नयेत, असा आदेश देण्यात आला होता. करोनानंतर यंदा मोठया प्रमाणावर बदल्यांसाठी अधिकारी प्रतीक्षेत आहेत.

 

जलसंपदा, वित्त, ग्रामविकास ,, महसूल, गृह, सार्वजनिक बांधकाम, ,गृहनिर्माण, परिवहन आदि विभागांत बदल्यांच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र, बदल्यांसबंघी सरकार आणि प्रशासनातही एकमत होत नव्हते. त्यामुळे शेवटी बदल्याच पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यासाठी निवडणुका आणि अन्य प्रशासकीय कारणेही मिळाली होती. त्यामुळे ३१ मे ही बदल्यांची मुदत संपण्याआधीच बदल्या ३० जूनपर्यंत स्थगित करण्याचा आदेश देण्यात आला. त्यामुळे अधिकार्यांची चांगलीच पंचायत झाली.

 

दोन्ही निवडणुका पार पडल्या आहेत. आता ३० जून तारीख जवळ आल्याने पुन्हा यासंबंधीची हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, त्याच दरम्यान राज्यात गोंधळाची राजकीय  स्थिती निर्माण झाली. अशा परिस्थितीत काय भूमिका घेतली जाते? याकडे संबंधित अधिकाऱ्यांचे डोळे लागले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या