Ticker

6/Breaking/ticker-posts

श्री क्षेत्र भगवान गडाच्या विकासासाठी रेकॉर्ड ब्रेक देणगी..!

कोरोनाच्या साथीनतंर भगवानगडाला देणगी चा ओघ सुरुच 

 घोगस पारगाव ग्रामस्थांकडून एक कोटी १३  लाखांची देणगीमहंत न्यायाचार्य डाॅ.नामदेव शास्त्री यांच्याकडे सुपूर्त





लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)



खरवंडी कासार  

संत भगवान बाबा च्या गरिब भक्ताच्या श्रीमंती मुळे  श्रीक्षेत्र भगवानगड कोट्याधिश होत असुन भक्ता कडुन मिळत असलेल्या देणगी मुळे भगवान गडावरिल विकासाचा आलेख वाढत आहे .

श्री क्षेत्र भगवान गडाच्या पायथ्या शी असणाऱ्या घोगस पारगाव ता . शिरूर या गावाने एक कोटी तेरा लाख रुपये देणगी भगवान गडाला दिली कोरोना संकटातून बाहेर येत ठिकठिकाणचे ग्रामस्थ महंत डॉ नामदेव शास्त्री यांना गावात येण्याचे निमंत्रण देत आहेत व  संत भगवान बाबाचे व  ईश्वराचे आभार मानत संत भगवान बाबाच्या  पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र भगवानगडाच्या विकासासाठी देणगी देत आहेत 

गावा गावात  एका दिवसात  गावात लोकवर्गणी करत संत भगवान बाबा वरिल भक्ती व भक्ती मधील शक्ती चा सगंम करत लाखो रुपये देणगी देण्याचे विक्रम होत आहेत  


           यापुर्वी  परभणी जिल्ह्यातील सेलु  तालुक्यातील बोरकीनी गावात  फक्त ४०० उंबरा असताना ही  या  बोरकिनी गावाने भगवान गडासाठी चक्क ९५  लाखाची रोख स्वरूपात  देणगी दिली होती  बिड जिल्हातिल   हिगंणी खुर्द गावाने  ४४ लाख तसेच वडवणी तालुक्यातील चिचंडवडगाव येथिल ११० भावीकानी ३१ लाख देणगी काही दिवसा पुर्वीच दिलेली असताना आता गडाच्या पायथ्याशी असलेल्या घोगस पारगाव ने एक कोटी तेरा लाख देणगी दिली असुन या गावातील बरेचशे कुटुंब उस तोडणी साठी बाहेर गावी आहेत ते आल्यावर या गावाचा देणगी चा आकडा  मोठा  वाढणार आहे 

       

 भगवान गडावरिल विकास कामे चालु असुण गडाचे महंत न्यायाचार्य डाॅ.नामदेव शास्त्री यांनी अत्यंत नियोजनबद्ध रीतीने भगवानगडाचा विकास हाती घेतला आहे  बीड व नगर जिल्ह्यात ग्रामीण,धार्मिक पर्यटनात अग्रेसर असलेला भगवान गड कोरोना नंतरच्या परिस्थितीतून पूर्वपदावर येत आहे.


          दोन वर्ष मंदिर बंद असल्याने महंतांनी तेथे ठाण मांडून बसत दैनंदिन विकासकामांवर लक्ष केंद्रित केले होते व विकास कामे चालु ठेवली होती . आता कोरोना च्या साथी नतंर जण जिवण पुर्व पदावर येत आहे तसे धार्मीक कार्यक्रमालाही सुरुवात झाली व भाविकांकडून देणग्या येण्याचे प्रमाण सुद्धा आता वाढत आहे.


अहमदनगर जिल्हात शिर्डी शणी शिगंणापुर  मोहटा देवी  या मोठ्या देवस्तान प्रमाणेच भगवानगडावर दर्शणासाठी येण्याचा भावीकाचा ओघ वाढत आहे श्रीक्षेत्र भगवानगडावरिल चालु असलेली विकास कामे गडावरिल संत ज्ञानेश्वरी विद्यापिठ गडावर चालु असलेले मोफत अन्नछत्र यामुळे भक्त प्रभावित होत आहे उस तोड मजुराची पढंरी म्हणुन संबोधल्या जाणाऱ्या या भगवान गडाला छोट छोट्या गावातुन लाखों रूपये देणगी मिळत असल्याने संत भगवान बाबा वरिल भक्ती व त्यातुन लोकवर्गणी च्या माध्यामातुन एकत्रीत होणारी देणगी रूपी शक्ती यामुळे गडाचा विकास जोमाने चालु आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या