Ticker

6/Breaking/ticker-posts

समाजोन्नत्तीचे काम करणार्यालना प्रोत्साहन दिले पाहिजे - भगवान फुलसौंदर

 मोरया पतसंस्थेच्यावतीने झोडगे, गुलदगड, सटाणकर यांचा सन्मान

 






मोरया नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने शरद झोडगेसचिन गुलदगड व राजेश सटाणकर  यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पतसंस्थेचे संस्थापक माजी महापौर भगवान फुलसौंदरनगरसेवक बाळासाहेब बोराटेप्रा.माणिक विधातेडॉ.सुदर्शन गोरेबाळासाहेब भुजबळअशोकराव तुपेदिपक खेडकरलवेश गोंधळेराजेंद्र पडोळे आदी. (छाया : राजु खरपुडे)

 

लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

नगर: अनेकजण आपल्या दैनंदिन कामाबरोबरच सामाजिक क्षेत्रातही आपल्या कार्याने वेगळा ठसा उमटवित असतात. आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून काम करुन समाजोन्नत्तीचे काम अशा लोकांकडून होत आहे. असे काम करणार्‍या लोकांना मिळालेला पुरस्कार, निवड, नियुक्ती ही त्यांच्या कार्याची पावती आहे. त्यांच्या कार्यास आपण प्रोत्साहन देणे हे आपले कर्तव्य आहे. त्यातून एक चांगला समाज निर्माण होऊ शकतो. शरदभाऊ झोडगे, सचिन गुलदगड, राजेश सटाणकर हे नि:स्वार्थपणे समाजाची एकप्रकारे सेवा करत आहे. त्यांच्या कार्याचा सन्मान करुन प्रोत्साहन देऊ, असे प्रतिपादन माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी केले.

मोरया नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने जिल्हा नियोजन समितीवर शरद झोडगे यांची नियुक्ती झाल्याबद्दल तसेच फार्मसिस्ट असोसिएशनच्या राज्य कार्यकारीवर निवड झाल्याबद्दल सचिन गुलदगड व ज्येष्ठ पत्रकार राजेश सटाणकर यांना बिहाणी पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पतसंस्थेचे संस्थापक माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, प्रा.माणिक विधाते, डॉ.सुदर्शन गोरे, बाळासाहेब भुजबळ, अशोकराव तुपे, दिपक खेडकर, शरद कोके, लवेश गोंधळे, राजेंद्र पडोळे आदि उपस्थित होते.

याप्रसंगी बाळासाहेब बोराटे, प्रा.माणिक विधाते, डॉ.सुदर्शन गोरे यांनी शरदराव झोडगे, सचिन गुलदगड, राजेश सटाणकर यांच्या कार्याचा गौरव करुन शुभेच्छा दिल्या. शेवटी अशोक तुपे यांनी मानले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या