Ticker

6/Breaking/ticker-posts

पाथर्डीत ‘ऊसाला आग’..! तीस एकरावरील ऊसाला आग, शेतकर्यांचे मोठे नुकसान

 



लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

पाथर्डी: एका वीज रोहित्राचा मोठा आवाज झाला, त्यातील ठिणग्या ऊडुन लग्तच्या ऊसाला आग लागली. बघता बघता तनपुरवाडी शिवारातील सुमारे पंचवीस ते तीस एकरातील ऊसाने पेट घेतला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.. केदारेश्वर आणि तनपुरे साखर कारखान्याच्या ऊस तोडणी कामगाराची ऊसाची तोड चालू असतांना आगीने रौद्ररूप धारण केले. ऊसतोडून ट्रॅक्ट्रर मध्ये भरलेल्या ऊसाला आगीचे लोळ पडू लागले .मात्र भोतालच्या नागरिकानी ते आटोक्यात आणल्याने ऊस तोडणी मजूर बचावले. काही कामगारांना किरकोळ स्वरूपाच्या इजा झाल्या आहे. ही घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घड्ली.

 

पाथर्डी हद्दीतील तानपुरवाडी शिवारातील मोहटादेवी रोडवरील निवासी मूकबधिर विद्यालयाच्या तिनही बाजूचा पंचवीस ते तीस एकर ऊसाचे जळीत होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. उद्धव भाबड, विठ्ठल भाबड ,नारायण पालवे, तुकाराम दहिफळे, नामदेव बडे, म्हातारदेव पालवे, महादेव पालवे, ज्ञानेश्वर पालवे, बाप्पू दहिफळे, रामनाथ दहिफळे या शेतकऱ्यांचा ऊसाला आग लागून ऊस जळाला. सुमारे तीस फुटापर्यंत आगीचे लोळ आकाशात गेले होते. तर तीन ते चार किलोमीटर आगीचा धुर पसरलेला होता. मोहटादेवी रोडवरील मूकबधिर निवासी विद्यालय असून तीन बाजूने ऊसाची शेती आहे. मागील बाजूने ऊस पेट घेत विद्यालया जवळ येण्याच्यापूर्वीच येथील सर्व शिक्षक स्थानिक नागरिक यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आहे. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

 

घटनेची माहिती मिळताच विद्यालयाचे विश्वस्त नंदकुमार डाळींबकर, अमोल गर्जे, मुकुंद गर्जे, राजेंद्र जोशी, सोनू डाळींबकर, गोरक्ष ढाकणे, मोहटा देवस्थानचे मुख्यकार्यकारी अधिकारी सुरेश भणगे व त्यांचे कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी विद्यालयाला व शेतकऱ्यांना मदत केली. पाथर्डी नगर परिषद व वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन अग्निशामकाने आगी विझवण्यासाठीची शर्तीचे प्रयत्न केले. माहिती मिळाल्यानंतर पालिकेचे शिवा पवार, अशोक बडे, काळू पवार, दिलावर शेख हे कर्मचारी तर पोलीस दल आणि वीज वितरण कंपनीच्या प्रतिनिधींनी घटनास्थळी भेट दिली. ऊसाची लागवड करून अनेक महिन्यापासून ऊस सांभाळला आहे. अचानक लागलेल्या आगीमुळे ऊस जळूय मोठ्या प्रमाणावर नुकसान आहे. शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी आणि उर्वरित असलेला ऊस कारखान्याने त्वरित घेऊन जाण्याची मागणी केली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या