Ticker

6/Breaking/ticker-posts

कोरोना काळात खरी माणसं कळली- संजय कळमकर

 



लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

अहमदनगर : कोरोना काळात प्रत्येक जण आपपल्या घरात होता. त्यांच्या आसपास घरातलीच माणसे होती, पण या दरम्यान ज्यांनी आपले छंद जोपासले , सुप्त गुणांना वाव दिला , त्याचे चीज केले. माणसे जपली , माणसे जोडली त्यांची काळजी घेतली त्यांना हे जीवन कळले कारण  त्या काळात वाचन हे एकमेव साधन होते,  कोरोना काळात खरी माणसं कळली, असे परखड मत प्रसिद्ध विनोदी साहित्यिक प्रा. डॉ. संजय कळमकर यांनी व्यक्त केले.


   शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने कोहिनुर मंगल कार्यालयात प्राचार्या डॉ. गुंफा कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली विद्या भडके यांच्या 'उठे तुफान काळजात' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते, यावेळी प्रा.डॉ बाबुराव उपाध्ये, प्रा.डॉ.संदिप सांगळे, मसाप चे जयंत येलूलकर, जेष्ठ कवी चंद्रकांत पालवे, अँड.अभय आगरकर, प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, दशरथ पवार, शरद झोडगे, परेश लोखंडे, डी व्ही अकोलकर, शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे आदी मान्यवर विचारपिठावर उपस्थित होते.  

पुढे बोलताना डॉ संजय कळमकर म्हणाले कि,  त्यावेळी सुचलेल्या विविध भाव भावनांचा कल्लोळ सौ. विद्या भडके यांनी उठे तुफान काळजात या काव्यसंग्रहात शब्दबद्ध  झाला आहे. विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी मराठी भाषा सर्वश्रेष्ठ असुन त्यातील सर्वात अवघड प्रकार म्हणजे कविता होय, कमी शब्दात आपल्या भावना व्यक्त कराव्या लागतात, त्यात कवयित्री विद्या भडके यशस्वी झाल्या आहेत.  प्रा.डॉ.संदिप सांगळे म्हणाले की, शिक्षकी पेशात असुनही कौटुंबिक जबाबदारी सांभाळून आपला छंद जोपासणे अवघड असूनही कवयित्री सामाजिक भान ठेऊन लेखन करीत आहेत, उद्याची सशक्त कवयित्री यातून निर्माण होऊ शकते.

प्रा. डॉ कॉ. मेहबूब सय्यद आपल्या भाषणात म्हणाले कि, आपला आवाज दाबला जात असुन कोणी काय खावे, प्यावे, कोणी काय ल्यावे यांच्याही गाईड लाईन दिल्या जात आहेत, लोकशाही मध्ये लेखक, कलावंतांचा आवाज दाबला जाऊ नये, महिला, कष्टकरी, श्रमिकांच्या व्यथा वेदना लेखक कवींनी मांडल्या पाहिजे. 

अध्यक्षपदावरून बोलताना डॉ. गुंफा कोकाटे म्हणाल्या की, आपल्या  समाजात स्त्री- पुरुष समानता महत्वाची असुन एकाच रथाची ही दोन चाके असतात, विद्या भडके यांना घरातुन साथ असल्याने त्यांना मुक्तपणे व्यक्त होता येते , म्हणूनच उठे तुफान काळजात हा काव्यसंग्रह  आपलं लक्ष वेधून घेतो.       

 यावेळी डॉ.बाबुराव उपाध्ये, भगवान फुलसौंदर, अँड अभय आगरकर, शरद झोडगे, जयंत येलूलकर यांनी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाच्या सुरुवातीला  चंद्रकांत पालवे यांनी दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण केली. सुनील गोसावी यांनी प्रास्ताविक केले, सुनीलकुमार धस व कवयित्री शर्मिला गोसावी यांनी सूत्रसंचालन केले, वंदना गिजरे यांनी स्वागत केले, भारत गाडेकर यांच्या पसायदानाने सांगता झाली, कवयित्री विद्या भडके व अनिल धाडगे यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास प्राचार्य डॉ. जी बी ढाकणे, जालिंदर बोरुडे, डॉ श्याम शिंदे, संगीता भालसिंग, प्रा,संगीता फसाटे, शब्दगंध चे कोपरगाव तालुका शाखा अध्यक्ष  कैलास साळगट, शरद दारकुंडे,  संतोष  धाडगे, गणेश भगत, शब्बीर शेख, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते,  कार्यक्रमाच्या यशस्वी तेसाठी भगवान राऊत, संजय भडके, डॉ अशोक कानडे,किशोर डोंगरे,डॉ तुकाराम गोंदकर,राजेंद्र फंड,बबनराव गिरी,सुदर्शन धस,महेश झोडगे,योगेश धाडगे  यांनी विशेष परिश्रम घेतले, शेवटी नेवासा तालुका अध्यक्ष प्रा डॉ किशोर धनवटे यांनी आभार मानले.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या