Ticker

6/Breaking/ticker-posts

'जनशक्ती' जि.प.च्या सर्व निवडणुका लढवणार - ॲड.शिवाजीराव काकडे









लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

शेवगाव : तालुक्याचे राजकारणात अनेकांनी वंशपरंपरेने पद भोगले आहेत. त्यामुळे तालुक्याचा विकास खुंटला. आता जनतेने तिसरा पर्याय निवडला पाहिजे. म्हणूनच जनशक्ती आता आगामी जि.प.निवडणुकीत सर्व गटातून निवडणूक लढवणार असल्याचे ॲड.शिवाजीराव काकडे यांनी राणेगाव येथे जाहीर केले. 

जि.प.सदस्या सौ.हर्षदाताई काकडे यांच्या विकास निधीतून मंजूर मौजे राणेगाव ते आधोडी रस्‍ता मजबूतीकरण व डांबरीकरण कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शहादेव खेडकर हे होते. 

पुढे बोलताना ॲड. शिवाजीराव काकडे म्हणाले की, शेवगाव तालुक्यात तिसरी शक्ती उभा राहू शकते, तिला बळ देण्याचे काम  आपणास करायचे आहे. शेवगाव तालुक्यातील सर्वसामान्यांचं पोरगं सभापती होऊ शकते. वंशपरंपरा आता आपल्याला मोडून काढायची आहे. शेवगाव तालुक्यातील युवकांचे भवितव्य घडवायचे असेल तर उद्योग व्यवसायाचे जाळे तालुक्यात उभे करावे लागेल असेही ते  म्हणाले.

 हर्षदाताई काकडे म्हणाल्या की, कोणतिही निवडणूक करण्यापूर्वी आम्ही जनतेला विचारतो. मगच निवडणूक करतो. माझ्या कामाची धास्ती विरोधकांनी घेतली आहे. जर मी या गटात काम करू शकते तर इतर गटात कामे का होऊ शकत नाहीत. त्यामुळे आता जनतेने आपला पर्याय बदलला पाहिजे असे त्या  म्हणाल्या.

 यावेळी देवराव दारकुंडे, जगन्नाथ गावडे ,भाऊसाहेब सातपुते, विष्णू दिवटे, सुरेश कापसे, भाऊसाहेब पोटभरे, भारत कापसे, नवनाथ तांबे, अशोक कणसे,भागवत रासनकर, अमर राजेभोसले, सतीश दसपुते, गोरक्ष गव्हाणे, नितीन घोरपडे, बाबा खंडागळे, फारुख शेख, जालिंदर कापसे, पांडुरंग वाघ, अंबादास गाढवे, अर्जुन तिडके, नारायण तिडके, नवनाथ खेडकर, पप्पू विघ्ने आदि प्रमुख उपस्थित होते. 



 '

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या