लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
पारनेर: "राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आतापर्यंत अनेक
कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे, भविष्यातही अनेक प्रवेश
होणार आहेत. आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन चालायचं आहे. विधानसभेच्या निवडणूकीत
कोणी आपल्याबरोबर नसेलही, विरोधात काम केले असेल. त्यावेळी
आपण त्यांची सेवा करण्यास कमी पडलो असू. आता आपल्या सोबत चांगल्या विचारांची लोकं
येणार असतील, दुसऱ्यांच्या खिशांवर डोळा ठेवणारे नसतील ! अशा
लोकांना आपण बरोबर घेणार आहोत. येत्या काळात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या
निवडणूका होणार आहेत. राज्यात काय होईल ते होईल आपल्या विरोधात मात्र सर्व असंतुष्ट
आत्मे राहणार आहेत. त्या सर्वांना आपण चारी मुंडया चित करीत असतो." असेही आ.
लंके म्हणाले.
"जलपुजनाचीही
अशीच स्पर्धा सुरू झाली आहे. सकाळी एक गट, दुपारी दुसरा गट
तर संध्याकाळी तिसरा गट जलपुजन करीत आहे. आरे हे काय चाललं आहे ? फक्त पेपरबाजीसाठीच ना ?तुमचं समाजासाठी काय योगदान
आहे ? तुम्ही जे काही समाजासाठी केलं आहे ते स्वतःच्या
टक्केवारीसाठीच केलंय दुसरं काय ? वेगळं काय आहे ?
तुम्ही जिल्हा परीषदेच्या माध्यमातून जगजाहीर बाजार मांडलाय !
कोणी १० टक्के दतो का ? कोणी १३ टक्के देतो का
? तुला काम देतो असे सांगितले जात आहे. नीलेश लंके दोन वर्षे
झालीत आमदार झालाय. असं कधी कानावर आलयं का कोणत्या अधिकाऱ्याला दोन रूपये मागितले
म्हणून ? समाजासाठी काम करणारी आत्मीयता लक्षात येते.
तालुक्यात सध्या हे भुछत्र उगवले आहेत ते दोन, चार
महिन्यांमध्ये आपण भुईसपाट करणार आहोत". असे आव्हान आ. लंके
यांनी यावेळी बोलताना दिले.
यावेळी बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड, संचालक अशोक कटारिया, अॅड. राहूल झावरे, बापूसाहेब शिर्के,संजिव भोर, शिवाजी व्यवहारे, बाळासाहेब खिलारी, अरूण आंधळे, व्हि. एस. उंडे, अंकुश पायमोडे, शिशिकांत आंधळे, संदीप चौधरी, डॉ.बाळासाहेब कावरे, श्रीकांत चौरे, गुलाबराव पाटील, अशोक पवार, रामदास दाते, सोमनाथ आहेर, लहू धुळे, झुंबराबाई आंधळे, वर्षा मुळे, जगदाळे सर, जनाबाई आंधळे, प्रकाश गाजरे, पांडूरंग जाधव, उमाताई बोरूडे, मयुरी औटी, दिपाली औटी, सुनिता आहेर,पियुष गाजरे, पोपट गुंड, अजित भाईक, बाळासाहेब शिंदे, सुभाष शिंदे, गुलाब राजे भोसले, नितिन दावभट आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या