Ticker

6/Breaking/ticker-posts

श्रीक्षेत्र मायंबा गडावरील नाथ भक्तांचा दसरा मेळावा रद्द

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

सावरगाव (ता.आष्टी) :) साधू ,संत ,महंत , यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक वर्षी श्री क्षेत्र मायंबा येथे नाथ भक्तांचा  दसरा मेळावा संपन्न होत असतो . मात्र यावर्षी कारोना  साथरोगाच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र मायंबा येथील नाथ भक्तांचा दसरा मेळावा  रद्द करण्यात आला आहे. अशी माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष दादासाहेब चितळे व सावरगावचे सरपंच राजेंद्र म्हस्के  यांनी दिली .

नाथ संप्रदयाचे मुख्य स्थान म्हणुन मायबाची ओळख आहे .आहे.मच्छिंद्रनाथ गडावर दसरा मेळावा,गुढीपाडवा, पौष अमावस्या , ऋषिपंचमी या दिवशी मच्छिंद्रनाथांचे मोठे उत्सव साजरे केले जातात.  तसेच अमावस्या पौर्णिमा व  गुरुवारी याठिकाणी हजारोच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात.

मच्छिंद्रनाथ देवस्थान समिती तर्फे  माजी मंत्री आमदार  सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली भाविकांसाठी विविध विकास कामे गडावरती सुरू आहेत .यामध्ये भक्त निवास, दर्शन बारी, परिसरात सुशोभीकरण, व्यवसायिकांसाठी गाळे यासाठी विविध विकास कामे प्रगतीपथावर आहेत.सात वर्षांपासुन मायंबा येथे दसरा मेळावा  आयोजन केले जाते .राज्याभरातुन नगर , बिड ,आष्टी, पाथर्डी, पुणे नाशीक या परीसरातील नाथ भत्त दसरा मेळावा  मच्छिंद्रनाथ गडावर  भावीक जमतात.   गर्दीमुळे  कोरोना साथ रोगाचा फैलाव होऊ नये यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सचिव बाबासाहेब म्हस्के यांनी दिली .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या