लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
कोल्हापूर : पूरग्रस्तांच्या मागणीसाठी जलसमाधी आंदोलनाचा निर्णय अखेर माजी खासदार राजू शेट्टी यांनी सायंकाळी मागे
घेतला. सोमवारी मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलविल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आंदोलन
तात्पुरते स्थगित केल्याची घोषणा केली. दरम्यान , बैठक
निष्फळ झाल्यास पुन्हा आंदोलन केले जाईल असा इशाराही त्यांनी दिला.
नृरसिंहवाडी येथे ही
पदयात्रा सायंकाळी पोहोचली. तेथे झालेल्या सभेत शेट्टी यांनी जलसमाधी आंदोलन
तात्पुरते स्थगित करत असल्याची घोषणा केली. राज्य सरकारने त्यांच्या आंदोलनाची दखल
घेत सोमवारी मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे यांच्या उपस्थितीत पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची बैठक घेण्याचे
आश्वासन दिले आहे. याबाबतचा प्रस्ताव इचलकरंजीचे प्रांताधिकारी विकास खरात यांनी
शेट्टी यांना दिला. त्यानंतर शेट्टीने हे आंदोलन स्थगित केल्याची घोषणा केली.
सायंकाळी पाचनंतर
जाहीर सभा होऊन थेट जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. नदीपात्राकडे
एकही कार्यकर्ता जाऊ नये यासाठी नदीच्या दोन्ही बाजूला मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला
आहे. हा बंदोबस्त चुकवत काही कार्यकर्त्यांनी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास नदीत
उडी मारली. त्यांना यांत्रिक बोटींच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले.
0 टिप्पण्या