Ticker

6/Breaking/ticker-posts

काष्टीतील( पारगावचा ता. आष्टी) मुलगा झाला रात्रीत स्टार

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)


काष्टी:  ज्याने आपल्या उभ्या आयुष्यात पंचवीस  हजार  रुपयेच्या पुढे  कधी पैसे पाहिले नव्हते त्याने आपल्या ज्ञानाच्या, वाचनाच्या जोरावर   कोण होणार करोडपतीच्या माध्यमातून साडेबारा लाख रुपये जिंकून   अंगद गोरख सावंतफुले( वय २९ वर्षे) मजुराचा मुलगा रात्रीत   स्टार झाला.

 श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील (पाचपुतेवाडी) येथील राहणारा मूळचा बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील पारगावचा  राहणारा पण सध्या कामानिमित्त  अंगद सावंतफुलें वय२९वर्षे या तरुणाला काल पर्यत कोणी ओळखत नव्हतं मिळेल ते काम करणारा  शेतात आई बरोबर  मोलमजुरी करून पोटभरणारा भाड्याच्या खोलीत राहणारा एवढीच काय ती त्याची ओळख


फक्त बारावी पास या तरुणाने आपल्या ज्ञानाच्या  जोरावर सोनी मराठी वाहिनीवरील कोण होणार करोडपती या मालिकेत सहभाग घेतला नुसताच सहभाग घेतला नाही तर अनेक अडथळे  पार करत हा तरुण थेट हॉटसीटवर विराजमान झाला आणि शिक्षण जरी कमी असले तरी त्याने केलेला अभ्यास आणि वाचनाच्या जोरावर त्याने नुकतेच  मालिकेत थेट बाराव्या प्रश्नापर्यंत मजल मारत एक दोन नव्हे तर तब्बल साडेबारा लाख रुपयांची कमाई केली असून मोलमजुरी करणारा हा तरुण काही क्षणात लखपती झाला आहे. त्याने अभ्यासपूर्ण दिलेली प्रश्नांची उत्तरे,त्याची ग्रामीण भागातील साधी भाषा,साधेपणा यामुळे सर्वच प्रेक्षक प्रभावीत झाले.

अंगद याच्या वडिलांचे दहा वर्षापूर्वी  निधन झाले त्याचा भाऊ मुंबईत खासगी कंपनीत काम करतो अंगद आपल्या आईसह कामासाठी मुळगाव सोडून काष्टीत आला त्याठिकाणी एका भाड्याच्या खोलीत राहू लागला त्याने मोलमजुरी शेतीकाम असे मिळेल ते काम केले त्याची आई देखील अजून काम करते परंतु अंगद ने बारावी झाल्यानंतर पाच वेळा पोलीस भरतीसाठी प्रयत्न केले तिथे त्याला यश आले नाही पण भरतीसाठी केलेला अभ्यास वाचन याचा त्याला या खेळात फायदा झाला त्या जोरावर त्याने थेट साडेबारा लाख रुपये जिंकले.

  सत्य परिस्थिती ऐकून अभिनेते  झाले प्रभावित 
अंगद हा जेव्हा हॉट सीटवर विराजमान झाला तेव्हा त्याने त्याच्या ग्रामीण शैलीत न लाजता आपल्या परिस्थितीचे स्वतःच्या दिसण्याचे मनमोकळ्यापणाने  सर्व वर्णन सांगितले  आपण दिसायला काळे नाकाचा शेंडा नसल्यामुळे आपल्याला सगळे नकटा म्हणतात तसेच शेतकाम करत असल्यामुळे कोणी मुलगी देत नाही म्हणून लग्न होत नाही ही सर्व हकीगत आपल्या शैलीत प्रामाणिकपणे खेळताना मांडली त्यामुळे अंगद ची करून कहाणी ऐकून प्रेक्षकांचे मन हेलावले आणि कार्यक्रमाचे निवेदक अभिनेते सचिन खेडेकर हे ही प्रभावित झाले.

तर.. मीच तुला जावई करुन घेतला असता

कोण होणार करोडपती खेळत असताना अंगदची आई खेडेकर यांना भाऊ अस म्हणल्या त्यावर अंगद म्हणाला सर आता तुम्ही नात्याने माझे मामा झाले मग मला एखादी मुलगी बघा त्यावर खेडेकर यांनी हसून अरे मला मुलगी नाही रे नाहीतर मीच तुला जावई करून घेतला असता असे म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला

कौतुकाचा वर्षाव

या खेळात आपल्या हुशारीची चुणूक दाखवत शिक्षणापेक्षा अनुभव आणि ज्ञान महत्वाचे असते इच्छाशक्ती असेल तर परिस्थिती ही अडचन ठरू शकत नाही हे अंगद ने दाखवून दिले दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करणारा अंगद आता लखपती झाल्यामुळे त्याच्यावर  सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या