Ticker

6/Breaking/ticker-posts

मिरी- तिसगाव नळ योजनेत नवीन ११ गावांचा समावेश- संभाजीराव पालवे

 

लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 पाथर्डी : मिरी- तिसगाव प्रादेशिक नळ योजनेचे पाणी मिळावे यासाठी आणखी नवीन अकरा गावाणी या योजनेत समावेश करण्याची मागणी केली असून सध्या  जलजीवन योजनेअंतर्गत या योजनेचा एका एजन्सीमार्फत सर्वे सुरू असून तो सव्हें पूर्ण झाल्यानंतर येणाऱ्या सर्व तांत्रिक अडचणी मंत्री प्राजक्त तनपुरे दूर करणार आहेत व ही योजना अधिक प्रभावीपणे चालण्यासाठी व प्रत्येक गावाला मुबलक व भरपूर पाणी मिळावे यासाठी महत्त्वाचा निर्णय घेणार असल्याची माहिती माजी सभापती संभाजी पालवे यांनी दिली.

 याबाबत पालवे यांनी सांगितले की मिरी तिसगाव योजनेअंतर्गत 28 गावांना पाणीपुरवठा केला जात असून या योजने मधील काही गावांना या योजनेचे पाणी घेण्याची गरज भासत नाही  त्यांच्या जागी आमच्या गावांना या योजनेत समावेश करून पाणी द्या अशी अकरा गावांनी मागणी केली असून मिरी तिसगाव नळ योजनेच्या माध्यमातून प्रत्येक लाभधारक गावाला पूर्ण दाबाने व सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी सुरवतीपासून मंत्री तनपुरे यांनी पाठपुरावा सुरू केलेला असून या योजनेच्या संदर्भात पहिल्याच अधिवेशनात त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता.

 त्याचबरोबर पाथर्डी येथे देखील या योजनेच्या संदर्भात महत्त्वाची बैठक घेऊन सर्वे पूर्ण झाल्यानंतर निश्चितच ठोस उपाय योजना करून प्रत्येक गावाला पाणी देण्याचे नियोजन केले जाणार असल्याचे सांगितले होते. मुख्य पाईप लाईनला काही अज्ञात लोकांनी कनेक्‍शन घेतले असल्याचे प्रकार पुढे आल्यानंतर मुळाधरण ते पांढरीचापूल, उदरमल पर्यंत लोखंडी पाईप लाईन जमिनीवरून टाकून  प्रत्येक लाभधारक गावाला पिण्याचे पाणी  देण्याचे नियोजन केले जाणार आहे.

 या योजनेत समाविष्ट करण्याची मागणी खांडगाव, जोहारवाडी, सातवड, कौडगाव,त्रिभूवनवाडी, निंबोडी, देवराई,घाटशिरस, शिरापूर,करडवाडी, पवळवाडी या गावानी केली आहे. तर डमाळवाडी गितेवाडी या गावाने मात्र अद्याप या योजनेत समावेश करण्याबाबत कुठलाही प्रतिसाद दिला नसल्याचे पालवे यांनी सांगितले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या