Ticker

6/Breaking/ticker-posts

डरने का नही, मॅडम नही आयेगी !, पारनेर तालुक्यात वाळू माफियां सुसाट !

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 पारनेर: तहसीलदार ज्योती देवरे यांच्या ऑडिओ बॉम्बे नंतर थंडावलेली वाळू तस्करी देवरे यांची बदली होताचपुन्हा एकदा मोठ्या धडाक्यात सुरू झाली आहे सध्या तालुक्यात प्रभारी राज असल्याने वाळू माफिया साठी सुगीचे दिवस असल्याचे बोलले जात आहे.

 पारनेर तालुक्यामध्ये अवैध वाळू उत्खनन व वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते गेल्या कित्येक वर्षापासून वाळू माफिया हे छुप्या पद्धतीने किंवा काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांचा अर्थपूर्ण आशीर्वाद घेऊन वाळू तस्करी करत असतात त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून या भागात निलाव झाला नाही एक प्रकारे वाळू माफियांकडून लिलाव होऊ दिला जात नाही असे बोलले जाते हीच वाळू लिलाव न झाल्याने चोरून विक्री केली जाते त्यामुळे सरकारी तिजोरीत जाणारा लाखो रुपयाचा महसूल बुडला जातो गेल्या दोन वर्षापूर्वी तहसीलदार म्हणून ज्योती देवरे यांनी पदभार स्वीकारला त्यानंतर त्यांनी अनेक कारवाया केल्या. त्यांचा माफियानी चांगलाच धसका घेतला होता.

दरम्यान नुकताच त्यांच्या ऑडिओ बॉम व्हायरल झाला त्यानंतर ही त्यांनी वाळू माफियांवर धडक कारवाया केल्या ऑडिओ क्लिप समाज माध्यमांद्वारे व्हायरल झाली त्यामध्ये त्यांनी थेट यंत्रणा तसेच लोकप्रतिनिधी त्यांच्यावर निशाणा साधत आत्महत्या करण्याचा इशारा दिला त्यामुळे हे प्रकरण राज्यभर चर्चिले गेले त्यामध्ये त्यांच्यावर भ्रष्टाचाराची चौकशी लावण्यात आली व कामात अनियमितता असे कारण देत त्यांची तडकाफडकी जळगाव येथे बदली करण्यात आली त्यानंतर तालुक्यात तहसीलदार पद रिक्त राहिल्याने तात्पुरता कार्यभार हा नायब तहसीलदार यांच्याकडे देण्यात आला आहे त्यामुळे तालुक्यात वाळू माफियांनी पुन्हा एकदा हैदोस घातला आहे त्याला आळा बसण्यासाठी पूर्णवेळ तालुक्यात तहसीलदार गरजेचे असून संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांमार्फत या माफिया राजला आळा घालण्याचा प्रयत्न वरिष्ठ स्तरावरून होणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

 डरनेका नही मॅडम नही आयेगी !

प्रभारी तहसीलदार गणेश आढारी यांच्यासाठी पारनेर तालुका नवखा आहे ते नुकतेच बदलून पारनेर येथे आले आहेत त्यांच्यावर प्रभारी तहसीलदार म्हणून मोठी जबाबदारी आलेली आहे.  त्यामुळे  तस्करांना रान मोकळे झाले आहे. डरनेका नही मॅडम नही आयेगी असे एकमेकांना खुणावत वाळूमाफिया सुसाट सुटले असून मांडवा नदी पात्र व लगतच्या शेतातून मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन व वाहतूक सुरू झाले आहे.

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या