Ticker

6/Breaking/ticker-posts

नगर जिल्ह्याचे राजकारण पवारांना काय कळणार ?- खासदार डॉ. सुजय विखे पाटील

 





लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

कर्जतकर्जत तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी व नगरसेवक यांच्या  राष्ट्रवादीत झालेल्या प्रवेशामुळे पुन्हा एकदा विखे व पवार या दोन कुटुंबातील राजकीय संघर्ष उफाळून आल्याचे चित्र सध्या कर्जत -जामखेड तालुक्यामध्ये दिसून येत आहे. याची झलक नुकतेच खा. विखे पा. यांनी आ. रोहित पवारांवर शेलक्या शब्दांत तालुक्यात येऊन टीका केल्याने पहायला मिळाली.

 या प्रवेशामुळे डीवचले गेलेल्या खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी नगर जिल्ह्याचे राजकारण पवारांना काय कळणार ?, अशा शेलक्या शब्दात रोहित पवारांना गर्भित इशारा दिला. 

कर्जत- जामखेड मतदार संघ हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला समजला जातो. पंचवीस वर्ष  येथे भाजपचे आमदार याठिकाणी निवडून जात होते. मात्र मागील विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांचे नातू व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी हा बालेकिल्ला जिंकला. ते एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी आता भाजपच्या किल्ल्यातील अनेक सैनिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे घेण्यास सुरुवात केली आहे .नुकताच भाजपचे काही पदाधिकारी व नगरसेवक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे .

याची गंभीर दखल भाजपाचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी घेतल्याचे दिसून येत आहे. कर्जत तालुक्यातील चापडगाव येथील कार्यक्रमांमध्ये त्यांनी जाहीर सभेमध्ये बोलताना पुन्हा एकदा पवार कुटुंबीयांवर टीका करताना नगर जिल्ह्याचे राजकारण यांना समजणार नाही. कारण जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये यांनी मतदार बारामतीत नेऊन ठेवले तरी देखील कर्जतची जिल्हा बँकेची संचालक पदाची जागा आम्हीच जिंकली आहे. आणि आगामी होणाऱ्या नगरपंचायत किंवा इतर निवडणुकीमध्ये देखील आमचे शिलेदार या ठिकाणी विजय मिळवून दाखवतील असा मला विश्वास वाटतो, असा सज्जड राजकीय दमच देऊन टाकला. खा. विखे एवढ्यावर थांबले नाही तर ते पुढे म्हणाले की, मी एक खासदार म्हणून या ठिकाणी आवर्जून सांगतो की कर्जत जामखेड तालुक्यातील नेतृत्व बदल झाल्यानंतर मतदार संघाचा विकास थांबला आहे. आज जी  ही कामाची उद्घाटन आणि भूमिपूजन होत आहेत, ते सर्व माजी मंत्री राम शिंदे यांच्या काळामध्ये मंजूर झालेली कामे आहेत असा निर्वाळा त्यांनी आवर्जून दिला.

 

रोहित पवार यांचे सडेतोड उत्तर

दरम्यान खासदार विखे यांच्या वक्तव्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची व आमदार रोहित पवार यांनी देखील तितक्याच सडेतोडपणे उत्तर दिले. ते म्हणाले की हे त्यांचे वैयक्तिक राजकीय वक्तव्य आहे . यामुळे त्याकडे किती लक्ष द्यावयाचे हे आम्ही ठरवले आहे. निवडणुकीमध्ये कोण विजय होणार हे जनता ठरवत असते,आणि जनतेच्या मनामध्ये काय आहे याची आम्हाला पुरेपूर माहिती आहे. उलट कधीतरी लोकांमध्ये यावयाचे त्यांना लोकांच्या मनात काय आहे हे समजत नाही व कोठे तरी ठराविक ठिकानी येऊन कोणी तरी बोलत असेल तर त्याला किती महत्त्व द्यावयाची हे आम्हाला माहित आहे. जिल्हा बँक निवडणुकीमध्ये ठराविक मतदार व पदाधिकारी मतदार होते . तरीही त्या निवडणुकीमध्ये पुरेशी तयारी नसताना आम्ही चांगली मते मिळवली आहेत. परंतु आगामी नगर परिषद व नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये आमचा जनतेवर पूर्णपणे विश्वास आहे. व लोकांच्या मनात काय आहे हे देखील आम्हाला माहित आहे असे आ. रोहित पवार म्हणाले. 

दरम्यान या आरोप - प्रत्यारोपाणे  आगामी राजकारण कसे असेल याची झलक पहायला मिळत आहे. दोन्ही तालुक्यात या दोन युवा नेत्यांमधील राजकीय संघर्ष टो काला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या