लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
नगर :अहमदनगर महानगरपालिकेच्या सभागृह नेतेपदी नगरसेवक अशोक बडे यांची नियुक्ती करुन महापौर सौ.रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. याप्रसंगी माजी उपमहापौर अनिल बोरुडे, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक गणेश कवडे, शाम नळकांडे, संग्राम कोतकर, दत्ता सप्रे, अमोल येवले, मदन आढाव, आकाश कातोरे, भालचंद्र भाकरे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी महापौर सौ.रोहिणी शेंडगे म्हणाल्या, अहमदनगर महानगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देण्यात येत असून, यात नगरसेवकांची भुमिका महत्वाची ठरत आहे. विविध विषयांवर मनपा सभामध्ये होणार्या चर्चेतून अनेक प्रश्न सुटत आहेत. यात सभागृहनेता म्हणून आपली भुमिका ही महत्वाची ठरणार आहे. आपल्या अनुभवाच्या जोरावर सर्वांच्या समन्वयातून आपण महानगरपालिकेची प्रतिमा उंचावताल, असा विश्वास व्यक्त केला.
निवडीनंतर सभागृहनेते अशोक बडे म्हणाले, महापौर सौ.रोहिणी शेंडगे व सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने आपली या पदावर नियुक्ती झाली आहे. या पदाच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्याबरोबर महानगरपालिकेच्या कार्यात चांगले योगदान देण्याचा प्रयत्न करु. पदाधिकारी व अधिकारी यांच्यात समन्वयातून नगरचा विकासास प्राधान्य देऊ, असे सांगून सर्वांचे आभार मानले.याप्रसंगी विलास शिरसाठ, बबन केतकर, दिलीप पेटकर, बाळासाहेब पाखरे, अॅड.पोपट बडे, बाळू भोर, भैय्या साठे, अण्णासाहेब फुंदे, मगर आदि उपस्थित होते.
0 टिप्पण्या