Ticker

6/Breaking/ticker-posts

पाथर्डी तालुक्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव

 खरवंडी कासार परिसरात आढळले पॉझिटिव्ह रुग्ण





लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

पाथर्डी /खरवंडी कासार   :

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्या नतंर  सर्वानी सुटकेचा निश्वास घेत असतानाच पाथर्डी तालुक्यात ग्रामीण भागात कोरोणाने शिरकाव केला आहे. खरवंडी कासार बरोबरच शेजारील वाडीवस्तीवर ही पुन्हा कोरोनाचा शिरकाव सुरु झाला आहे 

खरवंडी कासार प्राथमिक आरोग्य केदां अतंर्गत ३७ पॉझीटिव्ह आहेत या आरोग्य केद्रांअतंर्गत येणाऱ्या गावात आतापर्यंत २२८६  व्यक्ती कोरोनाची बाधा झाली होती त्यापैकी २२१४ व्यक्ती उपचार घेऊन बऱ्या झाल्या आहेत तर ३७ व्यक्ती वर उपचार चालु आहेत ३५ व्यक्ती चे कोरोना मुळे निधन झाले आहे                        पहील्या व दुसऱ्या कोरोनाच्या लाटेत लॉकडाऊन मळे व्यवहार ठप्प झाले होते जण जिवन विस्कळीत झाले होते कोरोना वर लॉकडाऊन हा पर्याय  नसल्याने कोरोना प्रतिबधांत्मक नियम घालुन शासणाने बाजारपेठ खुल्या केल्या . व्यवहार सुरळीत पणे चालु झाले  कोरोना हा लवकर जाणार नाही त्यांच्या बरोबर लढावेच लागेल  हे सर्वाना माहीती झाले परंतु कोरोनाचे मध्यंतरी रुग्ण कमी झाल्याने  माणसाची कोरोना बद्दलची भिती गायब  झाली  बहुंताशी व्यक्तीनी  मास्क वापरणे बंद केले   सॅनिटायझरचा   वापर आणि सोशल डिस्टन न  ठेवता  दैनदिन व्यवहार सुरू झाले  धार्मिक  सामाजीक गर्दी होणारी कार्यक्रमाची  सख्यांही वाढली  आणि  लपुन बसलेला कोरोना पुन्हा बाहेर पडु लागला आहे .    

निमावली पाळा

लॉकडाऊन नतंर अनलॉक झाले म्हणजे कोरोना गेला नाही आजही रुग्ण आढळुन येत आहेत रूग्ण सख्यांत वाढ होऊ नये व कोरोना साथीच्या आजारापासुन बचाव करण्यासाठी मास्क व  सॅनीटायझरचा वापर करा सोशल डिस्टन पाळा असे आव्हान खरवंडी कासार प्राथमिक आरोग्य केद्रांच्या वैद्यकीय अधिकारी मोनिका आघाव यांनी केले आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या