Ticker

6/Breaking/ticker-posts

राज्यातल्या ग्रामपंचायतींचे विज बिल शासन भरणार !

 


राज्यातील ग्रामपंचायत पदाधिकायांनी मानले आ. लंके यांचे आभार

लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 पारनेर: करोना काळात ग्रामपंचायतींचे उत्पन्न घटल्यामुळे स्ट्रीट लाईट तसेच पाणी पुरवठा योजनांची बिले सरकारने भरावीत या आ. नीलेश लंके यांच्या मागणीची राज्य शासनाने दखल घेत येत्या मार्च महिन्यापर्यंतची दोन्ही बिले राज्य सरकार भरणार असल्याचा निर्णय घेण्यात आला असून राज्यातील ग्रामपंचायतींच्या पदाधिकायांनी आ. लंके यांना धन्यवाद दिले आहेत.

आ. लंके यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून ग्रामपंचायतींच्या अडचणीसंदर्भात दि. ५ जुलै रोजी राज्य शासनाकडे पत्रव्यवहार केला होता.  आपल्या मतदारसंघात अनेक छोटया ग्रामपंचायती असून त्यांच्याकडे सध्या कोणतेही उत्पन्नाचे साधन नाही. विशेष म्हणजे पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांचे बिल भरणेही करोनाच्या पार्श्‍वभुमिवर त्यांना शक्य नाही. करोना काळातही महावितरणची ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा योजनांची लाखो रूपयांची बिले आली आहेत. त्यासंदर्भात माझ्याकडे विविध ग्रामपंचायतींनी तक्रारी केलेल्या असल्याचे आ लंके यांनी मुश्रीफ यांना पाठविलेल्या निवेदनात आ. लंके यांनी नमुद  केले होते.

 सबंधित बिले भरण्यासाठी राज्य शासनाने १५ व्या वित्त आयोगातून परवानगी दिलेली आहे. मात्र सबंधित निधीमध्ये हे बिल भरण्याईतकीही रक्कम उपलब्ध नाही. हा निधी विजेचे बिल भरण्यासाठी गेला तर त्या-त्या गावांमधील इतर बंद पडणार असल्याचे या निवेदनात नमुद करण्यात आले होते.

 मंत्री मुश्रीफ यांना  सबंधित विभागांना विज पुरवठा खंडीत न करण्यासंदर्भात आदेश देण्याची विनंती आ. लंके यांनी केली होती. मंत्री मुश्रीफ यांनी हा प्रस्ताव मंत्रीमंडळाच्या बैठकीत मांडल्यानंतर संपूर्ण राज्यातील ग्रामपंचायतींच्या स्ट्रिट लाईट तसेच पाणीपुरवठा योजनांची बिले भरण्याचा निर्णय घेतला. मार्च नंतर सबंधितांनी स्ट्रिट लाईट तसेच पाणीपुरवठा योजनांच्या बिलाची रक्कम जमा करण्याची जबाबदारी स्विकारण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. दरम्यान, आ. लंके यांच्या पाठपुराव्याने हा प्रश्न मार्गी लागल्याने राज्यातील सरपंचांनी आ. लंके यांचे आभार मानले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या