Ticker

6/Breaking/ticker-posts

योगामधील बीए कोर्सचा निकाल 100%

 ‘आरोग्यवर्धिनी’कडून योगाचा नव्याने एमए अभ्यासक्रम सुरू - 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क

नगर:आरोग्यवर्धिनी योग व निसर्गोपचार संस्थेच्या वतीने टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे प्रमाणित बी.ए. (योगा) हा अभ्यासक्रम शिकविला जातो. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही बी. ए.चा निकाल 100% लागला आहे. यंदाच्या वर्षीपासून एम. ए. (योगा) हा अभ्यासक्रम नव्याने सुरू करण्यात आलेला आहे.

यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना अध्यक्षा डॉ. हेमांगिनी पोतनीस, संचालिका डॉ. हेमा सेलोत, डॉ. शैलजा घुले, विशाल ठोकळ व दीपाली गांधी यांचे मार्गदर्शन लाभले. रिद्धी चंदे, पूजा चाकणकर, दीप्ती गांधी, किर्ती कुलकर्णी, गंगाप्रसाद खरात, योगेश कव्हाणे, अरुण खामकर, डॉ. नचिकेत वर्पे, आशिष जायभाय, सोहेल शेख, अतिकूर शेख, सायली राजोपाध्ये, प्रार्थना यन्नम आदींनी हा कोर्स पूर्ण केला आहे. या विद्यार्थ्यांना सन्मानपत्र देण्यात आले.

संस्थेच्या वतीने टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे डिप्लोमा इन योगा अ‍ॅण्ड नॅचरोपॅथी हा कोर्स शिकविला जातो. हा कोर्स दीड वर्षांचा असून, यासाठी किमान 12वी पास असणे आवश्यक आहे. हा कोर्स ड्रगलेस थेरपीवर आधारित आहे. कोर्सद्वारे विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या चर्चासत्राचे आयोजन केले जाते. बी.ए. (योगा) हा तीन वर्षांचा डिग्री कोर्स असून, त्यासाठी उमेदवार किमान 12वी पास असावा. एम.ए. (योगा) हा दोन वर्षांचा डिग्री कोर्स असून, यासाठी उमेदवार किमान ग्रॅज्युएट असावा. वरील कोर्ससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुकांनी 9422073590, 9309517617, 9423422511 या मोबाईलवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या