Ticker

6/Breaking/ticker-posts

IB Recruitment 2021: देशाच्या गुप्तचर विभागात विविध पदांची भरती..

 

*देशाच्या गुप्तचर विभागात काम करण्याची संधी

*दहावी, बारावी, पदवीधर उमेदवार करु शकतात अर्ज

*२१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत करा अर्ज
लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

नवी दिल्ली : IB Recruitment 2021देशाच्या गुप्तचर विभागात विविध रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदभरतीमुळे देशसेवेते काम करण्याची इच्छा पूर्ण होणार आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार यांचा तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आहे. या पदभरती अंतर्गत ५२७ पदे भरली जाणार आहे. यासाठी दहावी, बारावी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करु शकणार आहेत.

देशाच्या इंटेलिजन्स ब्युरोमध्ये उपसंचालक, ज्युनिअर इंटेलिजन्स ऑफिसर, सीनियर रीसर्च ऑफिसर, रीसर्च असिस्टंट, वरिष्ठ परकीय भाषा सल्लागार, असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर, असिस्टंट जनरल इंटेलिजन्स एक्झिक्युटिव्ह, अकाऊंटंट, सुरक्षा अधिकारी, स्टाफ नर्स, केअरटेकर ही पदे रिक्त भरले जाणार आहेत.

दहावी, बारावी आणि पदवीधर उमेदवारांकडून या पदभरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे वाहनाचा परवाना असणे आवश्यक आहे. तसेच या पदासाठी ५६ वर्षे ही वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे. सरकारी नियमानुसार आरक्षित वर्गाला यामध्ये सवलत देण्यात येणार आहे.

पदांचा तपशील
उपसंचालक: २ पदे, डेप्युटी सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर: १० पदे, ज्युनिअर इंटेलिजन्स ऑफिसर: १६८ पदे, सीनियर रिसर्च ऑफिसर: ०२ पदे, रिसर्च असिस्टंट: ०२ पदे, वरिष्ठ परकीय भाषा सल्लागार: ०१ पद, असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर: ५६ पदे, असिस्टंट जनरल इंटेलिजन्स एक्झिक्युटिव्ह: ९६ पदे, ज्युनिअर इंटेलिजन्स ऑफिसर : १३ पदे, पर्सनल असिस्टंट: ०२ पदे, अकाऊंटंट ऑफिसर: ०३ पदे, अकाउंटंट: २४ पदे, सुरक्षा अधिकारी : ०८ पदे, असिस्ंटट सिक्युरिटी ऑफिसर: १२ पदे, असिस्ंटट सिक्युरिटी ऑफिसर (टेक्निकल): १० पदे, फिमेल स्टाफ नर्स : १ पदं, ज्युनिअर इंटेलिजन्स ऑफिसर: ५२ पदे, सिक्युरिटी असिस्टंट: २० पदे, केअरटेकर : ०५ पदे, हलवाई कुक: ११ पदे,मल्टी टास्किंग स्टाफ: २४ पदे, लायब्ररी अटेंडंट: १ पदे रिक्त आहेत.

यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी इंटेलिजन्स ब्युरोच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याआधी उमेदवारांना नोटिफिकेशनमधील माहिती काळजीपूर्वक वाचावी लागेल. अर्जामध्ये काही चूक आढळल्यास अर्ज बाद करण्यात येईल. तसेच उमेदवारांनी काही खोटी कागदपत्र जोडलेली आढळल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल तसेच सरकारी नियमानुसार फसवणुकीची कारवाई होऊ शकते.

याभरतीसाठी ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज भरल्यानंतर याची प्रिंट दिलेल्या पत्त्यावर पाठवायची आहे. २१ ऑक्टोबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

उमेदवारांनी जॉईंट डेप्युटी डायरेक्टर/ इंटेलिजन्स ब्युरो, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, ३५ एस पी मार्ग, बापू धाम, नवी दिल्ली: ११००२१ या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या