Ticker

6/Breaking/ticker-posts

सोनार समाजाने एकसंघ होणे काळाची गरज: संतोष वर्मा








लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

नगर – सोनार व्यवसायिकांच्या आज विविध समस्या वाढत आहेत. शासकीय योजनांचा लाभ समजाला मिळावा , प्रलंबित प्रश्न सुटण्यासाठी सोनार समजाच्या सर्व शाखांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. असे प्रतिपादन सर्व शाखीय सोनार युवा सेना संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक संतोष वर्मा यांनी केले.

नगरमध्ये सर्व शाखीय सोनार युवा सेना संघटनेचा राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा संतोष वर्मा यांच्या पुढाकाराने नुकताच घेण्यात आला. यावेळी सर्व जिल्ह्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सराफ सुवर्णकार फेडरेशनचे राज्य सचिव सुधाकर टाक कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते. प्रमूख पाहुणे म्हणून पिंपरी चिंचवडचे माजी महापौर कैलास भांबुर्डेकर, सराफ फेडरेशनचे मराठवाडा अध्यक्ष गणेश बेद्रे, औरंगाबाद येथील उद्योजक मधुकरराव टाक, उद्योजक सुहासराव बार्शीकर, लाड सोनार संघटनेचे मधुकरराव मैड, संपादक भगवानराव शहाणे, उद्योजक बाळासाहेब शहाणे, सामाजिक कार्यकर्ते भगवानराव उदावंत, पुणे येथील उद्योजक गिरीषशेठ नगरकर आदींसह समाजबांधव उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले की, हॉलमार्किंग सक्तीचा कायदा चुकीच्या पद्धतीने सोनार व्यावसायिकांवर लादण्यात आला आहे. त्यास राज्यस्तरीय पातळीवर विरोध करण्यासाठी लवकरच मीटिंग घेऊन सर्वांना याची माहिती देऊन पुढील रूपरेषा ठरवू. सर्व शाखीय सोनार युवा सेना संघटनेच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडवण्या बरोबरच समाजाला संघटीत करण्यासाठी पुढाकार घेत आहे, 

 सर्वशाखीय सोनार सोनार युवासेना संघटने संस्थापक अध्यक्ष योगेश शहाणे यांनी नगरमध्ये राज्यस्तरीय मेळावा घेतल्याबद्दल प्रमुख मार्गदर्शक संतोष वर्मा यांचा सत्कार केला. कार्यक्रमात सर्वशाखीय सोनार युवासेना संघटनेच्या वतीने घेण्यात आलेल्या  राज्यस्तरीय निबंध स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षिस वितरण करण्यात आले. तसेच सर्वशाखीय सोनार युवासेना संघटनेच्या नूतन पदाधिकारींना नियुक्ती पत्रके देण्यात आली.

यावेळी लाड सोनार ट्रस्ट अहमदनगर चे संजय देवळालीकर, शरद कुलथे, सचिन देवळालीकर, मुकुंद निफाडकर, ग्रामपंचायत सदस्या श्रावणी बेद्र, सौ.कल्पना बनसोड व कार्यक्रमच्या यशस्वीते साठी महिला संघटक रेखा नवसे, प्रसिद्धी प्रमुख रवी माळवे, प्रशांत टाक, विदर्भ संपर्क प्रमुख अनिल उंबरकर, मुंबई विभाग प्रमुख जगदीश काजळे, मराठवाडा प्रमुख विनोद चिंतामणी, अष्टी तालुका प्रमुख दीपक डहाळे, ज्ञानेश्वर बागडे आदींनी परिश्रम घेतले. कार्याक्रमचे सुत्रसंचलन श्रीकांत बेद्रे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या