लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
खरवंडी कासार :राजकीय श्रेय घेण्यासाठी खरवंडी कासार येथे कोव्हीड सेंटर सुरू करण्यास विलंब करत जनतेला वेठीस धरण्याचे काम काही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते करत असल्याचा आरोप मिथुन डोंगरे यांनी केला आहे.
खरवंडी कासार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जिल्हाधीकारी यांनी कोरोना साथीच्या पार्श्वभुमीवर आढावा बैठक घेतली होती. त्यामध्ये जिल्हाधिकारी डॉ राजेद्र भोसले यांनी भालगाव जिल्हा परिषद गटात कोरोना रुग्णाची संख्या वाढत असल्याने विचार करून खरवंडी कासार येथे बुधवार पर्यत शासकीय कोविड सेंटर सुरू करण्याचे आदेश तालुका प्रशासनाला दिले होते. यावर तालुका प्रशासनाने दिनांक ०६ ऑगस्ट रोजी सेंटर सुरू करण्याचे निश्चित केलेली असताना आज अचानक कोवीड सेंटर उद्घाटन समारंभ एक दिवस पुढे ढकलण्यात आला. उद्घाटन पुढे ढकलण्याचा घाट कोणी घातला आणि कुणासाठी घातला ज्यामुळे आज होऊ घातलेले सेंटरचे उद्घाटन एक दिवस पुढे गेले.यावर आता आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
खरवंडी कासार आणि परिसरामध्ये ढाकणवाडी फाटा येथे अनेक रुग्ण विलगीकरण कक्षामध्ये उपचार घेण्यासाठी आलेले असताना केवळ श्रेय वादासाठी कोविंड सेंटर सुरू करण्यासाठी विलंब करण्यात आला जनतेला वेठीस धरण्याचे काम काही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते करत असल्याचा आरोप मिथुन डोंगरे यांनी केलेला आहे
पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार परिसरात कोराणा रूग्णसंख्या वाढता आलेख पाहता जिल्हा अधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांच्या आदेशान्वये खरवंडी कासार येथे कोवीड सेंटर अद्यावत करावे असा आदेश दिला सर्वतयारी पुर्ण झाली मात्र कोवीड सेंटर का चालु झाले नाही परिसरातील ग्रामस्थांनी आमचे नातेवाईक कोरोणाग्रस्त आहेत विलगी करणाची व्यवस्था करा अशी मागनी केली मिथूण डोंगरे यांच्या कडे केलीआहे परिसरात रुग्ण संख्या वाढत आहे कोवीड सेंटर अद्यावत केले मात्र अधिकृत सेंटर चालु नाही सर्व तयारी असताना विलंब का ? असे मत डोंगरे यांनी व्यक्त केले. जिल्हाधिकारी यांच्या पेक्षा तुम्ही मोठे आहात का ? जिल्हा अधिकारी यांच्या आदेशानवे सर्वसामान्य नागरिकांना सुविधा द्या असे मत डोंगरे यांनी व्यक्त केले.
यावर तालुका आरोग्य अधिकारी व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या विषयावर बोलण्यास स्पष्ट नकार दिला
0 टिप्पण्या