Ticker

6/Breaking/ticker-posts

शेवगाव तालुका मनसेच्या वतीने पूरग्रस्तांना मदतीचे साहीत्य वाटप
लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)


शेवगाव- शेवगाव तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने  शेवगाव तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे यांच्या नेतृत्वाखाली   कोकणातील चिपळून येथे  पूरग्रस्तांना मदतीचे साहीत्य वाटप करण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी पूरग्रस्तांना सर्वपतोरी मदत करण्याचे आदेश दिले होते.

 मनसचे सरचिटणीस मनोज चव्हाण व जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर यांच्या मार्गदर्शनाने शेवगाव तालुका मनसेच्या वतीने ३५० पिण्याचे पाणी बाॅक्स,२०० रग(बॅल्केंट)१०० बिस्किट बाॅक्स,२५ मेणबत्ती बाॅक्स,२५ माचिस बाॅक्स,३०० भेळ पाकिटे, ३०० किलो तांदुळ,२०० किलो ज्वारी आदि साहित्य मनसेचे शेवगाव तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे ,उपजिल्हाध्यक्ष गोकुळ भागवत,संजय वणवे,संदिप देशमुख,संतोष शित्रे,देविदास हुशार,गणेश डोमकावळे, विठ्ठल दुधाळ, ओकांर दगडे, ज्ञानेश्वर कुसळकर, यांच्या वतीने वाटप करण्यात‌‌‌ आले. 

शेवगाव शहरातील हाॅटेल व्यावसायिक संघटना, तसेच इनरव्हील क्लब शेवगाव यांनी देखील या मदत कार्यात मनसेला हातभार लावला.  या मदतीच्या वाहनाचे पुजन शेवगाव पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक सोपान गोरे यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या