अहमदनगर: येथील
मोहरमचा सण प्रसिद्ध आहे. बडे बारा इमाम आणि छोटे बारा इमाम यांच्या सवाऱ्यांची
स्थापना करून मोहरमच्या दिवशी ताबुतांचे विसर्जन करण्यात येते. मात्र सलग दुसऱ्या
वर्षी कोरनाच्या पार्श्वभूमीवर करोनाची मिरवणूक निघाली नाही.
यावर्षी १५ ऑगस्टला
सायंकाळी सवाऱ्यांची स्थापना झाली. गुरूवारी कत्तलची रात्री होती. त्यावेळीही
मिरवणूक काढण्यात आली नव्हती. शुक्रवारी दुपारी मिरवणूक न काढताच कोठला येथे
सवाऱ्यांचे विसर्जन करण्यात आले. मोहरम काळात करोनाचे नियम पाळून सर्व धार्मिक
विधी पार पाडण्यात आले.
ट्रस्टचे विश्वस्त, मोजक्याचे यंग पार्टीचे कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांच्या
उपस्थितीत जागेवरच ताबुतांचे विसर्जन करून मोहरमची सांगता करण्यात आली.
0 टिप्पण्या