Ticker

6/Breaking/ticker-posts

जर.. गोपीनाथ मुंडे नसते तर.. पारावर टाळ कुटीत बसलो असतो: रावसाहेब दानवेंची चौफेर टोलेबाजी

 *भाजपची जनआशीर्वाद यात्रा

*मुख्यमंत्र्यांवर साधला निशाणा








लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

जालनाः '३५ वर्ष मला जालना जिल्ह्यातील मतदारांनी खासदार केलं म्हणून आज केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री झालो. जर दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे नसते  तर आज जवखेड्याच्या मारुतीच्या पारावर हरिपाठ करत टाळ कुटीत बसलो असतो,' असं मिश्किल विधान केंद्रीय राज्य रेल्वेमंत्री रावसाहेब दानवें यांनी केलं आहे.

भाजपची जनआशीर्वाद यात्रा गुरुवारी जालन्यात होती. यावेळी रात्री उशीरा रावसाहेब दानवे यांची सभा पार पडली. या सभेत रावसाहेब यांनी चौफेर टोलेबाजी केली आहे. ' मला जालन्यात राहून कोलकाता, मुंबई दिसते कारण मी कार्यकर्त्यांच्या खांद्यावर उभा आहे. कारण मला जाणीव आहे पुढाऱ्याचे मोठेपण कशात आहे. ३५ वर्ष मला जालना जिल्ह्यातील मतदारांनी खासदार केलं म्हणून आज केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री झालो. हे झालं नसतं तर आज जवखेड्याच्या मारुतीच्या पारावर हरिपाठ करत बसलो असतो,' असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.


' पंतप्रधान नरेंद मोदींनी देशातील नागरिक आणि महिलांसाठी विविध योजना आणल्या. १९८० ला मी ५ हजार रुपयात गॅस विकत घेतला होता. पण आज मोदींमुळे १०० रुपयांत गॅस कनेक्शन मिळत आहे. मोदींनी शेतकऱ्यांना युरियाच्या बॅगमागे १ हजार २५० रुपये सबसिडी दिली. राज्यात मात्र अमर-अकबर-अँथनीचं सरकार आहे. आम्ही करोना काळात रस्त्यावर उतरुन काम केलं. पण मुख्यमंत्री घरात बसून म्हणतात 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी',' असा जोरदार टोला दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या