Ticker

6/Breaking/ticker-posts

डॉ. वैशाली झनकर यांच्या कोठडीत वाढ; आता मोठ्या कारवाईची शक्यता

 

*डॉ. वैशाली झनकर यांच्या पोलीस कोठडीत वाढ.

*लाचखोरी प्रकरणी निलंबनाची कारवाई अटळ.

*ठाणे पोलिसांचे एक पथक सध्या नाशिकमध्येच.
लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

नाशिक : लाचखोरीच्या प्रकरणात पोलीस कोठडीत असलेल्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली. त्यांच्या जामीन अर्जाबाबत त्यानंतरच विचार करण्यात येणार आहे. दरम्यान, झनकर यांचं निलंबन अटळ मानलं जात आहे.

डॉ. वैशाली झनकर यांना शुक्रवारी सकाळी एसीबीने अटक केली. यानंतर त्यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी केली. जिल्हा कोर्टाने दिलेल्या कोठडीची मुदत शनिवारी (दि.१४) संपल्याने त्यांना जिल्हा कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी एसीबीने आतापर्यंत झालेल्या तपासाची माहिती दिली. तर, बचाव पक्षाने सुद्धा आपली बाजू मांडली. दोन्ही बाजूचा युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर कोर्टाने वैशाली झनकर यांच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ केली. एसीबीच्या तपासासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता असल्याचे निरीक्षण कोर्टाने नोंदवले. झनकर यांनी आपला जामीन अर्ज सादर केला असून पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतरच त्यावर सुनावणी होऊ शकते. ठाणे पोलिसांचे एक पथक सध्या नाशिकमध्ये तळ ठोकून बसले असून, झनकरांची चौकशी सुरू आहे

शिक्षक दशपुते निलंबित

२० टक्के अनुदान मंजूर असल्याने सुधारित नियमानुसार वेतन करण्याची परवानगी देण्यासाठी आठ लाख रुपयांची लाच घेतल्याने माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर वीर यांसह प्राथमिक शिक्षक पंकज दसपुते आणि शासकीय वाहनचालक येवले या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. दशपुते आणि येवले न्यायालयीन कोठडीत असून, डॉ. झनकर पोलीस कोठडीत आहेत. वाहनचालक येवले याला शुक्रवारी शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांनी निलंबित केले. तर, दशपुते याच्या निलंबिताचे आदेश शनिवारी (दि.१४) काढण्यात आले. दरम्यान, डॉ. झनकरांवरील शिस्तभंग आणि निलंबनाच्या कारवाईचा प्रस्ताव पुणे येथील शिक्षण आयुक्तांकडे प्रलंबित आहे. मात्र, मंगळवारी (दि. १०) लाच स्वीकारल्यानंतर चार दिवसांपासून माध्यमिक शिक्षणाधिकारी पदावर कोणीही प्रभारी अधिकारी नियुक्त झालेले नाहीत. डॉ. झनकरांच्या निलंबनाचे आदेश निघतील त्यातच, नवनियुक्त शिक्षणाधिकारी अथवा प्रभारी शिक्षणाधिकाऱ्यांच्या नावाचा खुलासा होण्याची शक्यता आहे.

डॉ. झनकरांचे निलंबन अटळ


डॉ. वैशाली झनकर वीर यांना यांच्यावरही निलंबनाची कारवाई होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. शासकीय अधिकारी ४८ तास कोठडीत राहिल्यानंतर त्यांचे निलंबन अटळ असते. त्यानुसार निलंबनाच्या प्रस्तावावर अद्याप निर्णय झाला नसला, तरी मंगळवारपर्यंत (दि.१७) शिक्षणाधिकारी झनकरांचे निलंबन होणार, हे अटळ असल्याची माहिती शिक्षण खात्यातील सूत्रांनी दिली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या