Ticker

6/Breaking/ticker-posts

बालंबाल बचावले ! चालत्या बसची चाके निखळली; चालकाने दाखवले प्रसंगावधान

 








लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

औरंगाबाद: हैदराबादहून देगलूरला (जि. नांदेड) येणाऱ्या राज्य परिवहन मंडळाच्या बसची दोन चाके निखळली. ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला. मात्र मध्यरात्री तीन वाजता हा प्रकार घडूनही परिवहन मंडळाची मदत पहाटे पाच वाजता पोचली. तोवर प्रवासी चालक, वाहक बसमध्येच बसून होते.


सूत्रांनी दिलेली माहिती अशी, की देगलूर आगाराची बस (क्रमांक एम एच ०९ एफ एल १०५९) गुरुवारी रात्री अकरा वाजता हैदराबादहून निघाली. बसमध्ये प्रवासी संख्या कमी होती. रात्री तीनच्या सुमारास बस देगलूरपासून दहा किलोमीटर असलेल्या बिचकुंदाजवळ आली. बिचकुंदा ते मेनूर दरम्यान चालत्या बसची मागच्या बाजूची दोन चाके निखळली. चालकाने प्रसंगावधान राखून बसला नियंत्रणात आणले. त्यामुळे अनर्थ टळला.


रात्री तीनची वेळ रस्त्यावर बस बंद पडली. तातडीने देगलूर आगाराला संपर्क साधून मदत मागण्यात आली. पण सकाळी पाच वाजता आगारातील मेकॅनिक घटनास्थळी पोचले, दुरुस्ती केली. त्यानंतर बस देगलूरला पोचली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या