Ticker

6/Breaking/ticker-posts

जामखेड नगरपरिषदेच्या घांटागाडी वाल्यांची दादागिरी थांबवा -- राळेभात

 



  





लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

जामखेड :शहरात नगरपरिषदेने गल्लोगल्ली कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडीची व्यवस्था केलेली आहे मात्र या घंटागाडी वरील कर्मचारी या गाडीत कचरा टाकणाऱ्या नागरिकांशी उध्दट वागणूक व महिलांशी असभ्य वागणूक करतात ,त्यामुळे नगरपरिषदेने या कर्मचाऱ्यांना समज द्यावी अशी मागणी अहमदनगर जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात यांनी  निवेदनाद्वारे नगरपरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे केली आहे .                                                                               

 जामखेड शहरात कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी फिरते.मात्र त्या गाडी सोबत येणारा कर्मचारी कचरा देण्यासाठी येणाऱ्या महिला,मुली यांचेशी अर्वाच्य,उद्धट भाषेत बोलतात.घंटागाडी मध्ये कचरा टाकण्यासाठी घराच्या बाहेर घरातील महिला,मुलगी किंवा मुलगा येतो.त्यावेळी घंटागाडी वरील कर्मचारी यांचेकडून होणारी वागणूक हि महिलांना न शोभणारी आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्याची योग्य ती दखल घ्यावी.


महाराष्ट्रातील इतर नगर परिषदा,नगर पालिका,महानगरपालिका यामध्ये फिरणाऱ्या घंटागाडी सोबत येणारे कर्मचारी स्वतः कचरा घेऊन घंटागाडीत टाकतात.परंतु आपल्याकडे नागरिकांना घंटागाडी मध्ये स्वतः कचरा टाकावा लागतो व तो ओला आणि सुका असा वेगळा करून सुद्धा इकडे टाका तिकडे टाका असे सांगणारा घंटागाडी सोबतचा कर्मचारी कसलीही मदत करत नाही. उलट येणाऱ्या महिला,मुली,मुले उंचीने लहान असतील तर तो कचरा गाडीत पडण्याऐवजी पुन्हा त्यांच्या हातावर पडतो. अशावेळी घंटागाडी सोबतच्या कर्मचाऱ्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक कर्मचाऱ्याच्या उद्धट वागण्याला सामोरे जावे लागते. त्यासाठी कचरा टाकण्यासाठी येणाऱ्या महिला,मुली,मुले यांचेकडून स्वत कचरा घेऊन कर्मचाऱ्यानी तो कचरा घंटागाडीत टाकावा व कचरा बकेट जागेवर ठेवावी.


सध्या कोरोनाचा काळ आहे.पावसाळ्यात साथीचे,संसर्गजन्य रोग बळावण्याची शक्यता असते.शहरात स्वच्छता नसेल तर शहरातील आरोग्य बिघडण्याची शक्यता असते.त्यासाठी शहरातील स्वच्छता हा विषय फार महत्वाचा असल्याने कचरा गोळा करणाऱ्या घंटागाडी वरील कर्मचाऱ्याना स्वच्छतेबाबत व त्यांच्या वागणुकीबाबत आपल्या पातळीवरून योग्य त्या सूचना दया .जेणेकरून जामखेड शहर सुंदर व स्वच्छ होण्यास मदत होईल. असे अमोल राळेभात यांच्या निवेदनात म्हटले आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या