Ticker

6/Breaking/ticker-posts

राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्याचे चिरंजीव समाजकारणात..

 *राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांचे चिरंजीव समाजकारणात सक्रिय

*'सारथी' संस्थेबाबत अजित पवारांना दिलं निवेदन









लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 मुंबई: राजकीय नेत्यांच्या मुला-मुलींनी राजकारणात सक्रिय होणं हे आपल्याकडं नवीन नाही. बहुतेक पक्षातील बहुतेक नेत्यांची मुलं आपल्या आईवडिलांचा वारसा चालवताना दिसतात. राष्ट्रवादी काँग्रेसही त्यास अपवाद नाही. या पक्षातील अनेक नेत्यांची मुलं, पुतणे व इतर नातेवाईक सार्वजनिक जीवनात काम करत आहेत. यात आता आणखी एका नावाची भर पडली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील  यांचे चिरंजीव प्रतीक पाटील यांनी देखील हाच कित्ता गिरवला आहे. ते सध्या सामाजिक क्षेत्रात सक्रिय झाल्याचं दिसत आहे. नुकत्याच आलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील पुराच्या वेळीही प्रतीक यांनी सांगलीत जयंत पाटलांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं होतं. पुरात अडकलेल्या लोकांना मदत, अन्न पाण्याचा वाटप करण्याबरोबरच मुक्या जनावरांची देखभाल करण्याचं कामही त्यांनी केलं. त्यानंतर आज प्रतीक यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मागण्यांचं एक निवेदन दिलं. ' सारथी संस्थेमार्फत मराठा समाजातील युवक-युवतींच्या हितासाठी नवीन उपक्रम राबविण्यात यावेत, अशी मागणी प्रतीक यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

' सारथी' संस्था मराठा समाजातील मुलांसाठी उत्कृष्ट काम करत आहे. मात्र, या संस्थेच्या माध्यमातून अधिक नवे उपक्रम राबवले जाऊ शकतात. शिक्षण प्रशिक्षण, कौशल्य विकास या त्रिसूत्रीच्या आधारे सारथीनं काम केल्यास मराठा समाजातील युवक-युवतीच्या विकासासाठी मोठं काम होईल, असं प्रतीक यांनी निवेदनात म्हटलं आहे. केवळ निवेदन देऊनच ते थांबले नाहीत, त्यांनी काही उपयुक्त सूचनाही सरकारला केल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या