Ticker

6/Breaking/ticker-posts

बोरुडे यांनी दृष्टीदोष असलेल्या दीन, दुबळ्यांचे जीवन प्रकाशमान केले -बाळासाहेब सानप

 ओबीसी, व्हीजेएनटी जनमोर्चाच्या वतीने नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांचा गौरव



 





लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

अहमदनगर :दृष्टीदोष असलेल्या दीन, दुबळ्यांचे जीवन प्रकाशमय करण्याचे काम जालिंदर बोरुडे यांनी फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून केले. कोणतेही राजकीय व शासकीय पाठबळ नसताना पाटबंधारे विभागात कार्यरत राहून स्वखर्चाने त्यांनी सर्वसामान्यांसाठी चालवलेली चळवळ प्रेरणादायी आहे. असे प्रतिपादन जनमोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी केले.

ओबीसी, व्हीजेएनटी जनमोर्चाच्या वतीने टाळेबंदीत दीन, दुबळ्यांना आधार देण्यासाठी फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या मोफत आरोग्य व नेत्र शिबीराबद्दल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांचा जनमोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्या हस्ते बोरुडे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी नगर शाखेचे शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, माजी नगरसेवक सुनील भिंगारे, संघटनेचे सरचिटणीस रमेश सानप, माजी नगरसेवक अशोक दहीफळे, डॉ. सुदर्शन गोरे, अनुरिता झगडे आदी उपस्थित होते.

बाळासाहेब सानप पुढे म्हणाले की,  कोरोनाच्या संकटकाळात सर्वसामान्यांची गरज ओळखून निशुल्क आरोग्य व नेत्र शिबीर घेऊन त्यांना आधार देण्याचे कार्य केले. या कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली असून, राष्ट्रीय अंधत्व समितीतर्फे त्यांचा सन्मान तत्कालीन केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या हस्ते झाला. ही जिल्ह्याच्या दृष्टीने अभिमानास्पद गोष्ट आहे. नेत्रदान चळवळीच्या माध्यमातून हजारो व्यक्तींना नवदृष्टी देण्यासाठी त्यांचे सुरु असलेले कार्य दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले. 

बाळासाहेब भुजबळ यांनी फिनिक्स फाऊंडेशन राबवित असलेल्या शिबीराच्या माध्यमातून अनेक गरजूंची सोय होत असल्याचे सांगितले. नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी आरोग्य सुविधा खर्चिक असल्याने सर्वसामान्यांच्या परवडत नाही. कोरोनाच्या संकटामुळे सर्वसामान्यांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असताना आरोग्य सुविधा घेणे अशक्य झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये माणुसकीच्या भावनेने फिनिक्सचे कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

 कार्यक्रमास छावणी मंडळाचे माजी सदस्य नामदेव लंगोटे, डॉ. श्रीकांत चेमटे, संजय सागावकर, कैलास दळवी, फिरोज खान, नईम शेख, प्रकाश सैंदर, रजनी ताठे, पालवे, राजेंद्र पडोळे, राजेश सटाणकर, शशिकांत पवार उपस्थित होते.    


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या