Ticker

6/Breaking/ticker-posts

नगरमधील 'ते' प्रकरण चिघळले; आता शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुखाविरुद्ध खंडणीचा गुन्हा

 *शिवसेना उपजिल्हाप्रमुखांविरोधात खंडणीचा गुन्हा

*माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम गटाने  केली तक्रार



लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

अहमदनगर: शहरातील दिल्लीगेट येथील गाळ्यांवरून झालेल्या वादाला नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणी प्रथम माजी महापौर श्रीपाद छिंदम व त्याच्या साथिदारांविरुदध जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. आता दुसऱ्या गटाकडून देण्यात आलेल्या फिर्यादीवरून शिवसनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीष जाधव यांच्यासह सहा जणांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथे गाळे बांधायचे असतील तर साठ हजार रुपये हप्ता द्यावा लागेल, असे जाधव यांनी धमकावल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.


दिल्लीगेट येथे ज्युसचे दुकान चालविणारे भागीरथ भानुदास बोडखे (वय ५२ रा. नालेगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीपाद शंकर छिंदम, श्रीकांत शंकर छिंदम, महेश सब्बन, राजेंद्र जमदाडे यांच्यासह साथिदारांविरुदध जातीवाचक शिवीगाळ, तोडफोड आणि पैस चोरून नेल्याचा गुन्हा दाखल झाला होता.

आता याच प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात दुसरी फिर्याद आली आहे. विजय रमेश सामलेटी (रा. तोफखाना) यांनी ही फिर्याद दिली आहे. त्यावरून गिरीश जाधव यांच्यासह त्यांचा भाऊ राजेश जाधव, बाळासाहेब जाधव, चेतन जाधव, भागीरथ बोडखे, प्रतिक बोडखे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गाळा बांधकाम करायचे असेल तर प्रत्येक गाळ्यामागे पाच हजार याप्रमाणे १२ गाळ्यांचा ६० हजार रुपये हप्ता द्यावा लागेल, असे म्हणत खंडणी मागितल्याचा आरोप आहे. 

फिर्यादीत म्हटले आहे की, १२ ते १५ जुलै या काळात हा गुन्हा घडला. विजय सामलेटी यांच्यासह माजी नगरसेवक श्रीपाद छिंदम व त्यांच्या ओळखीचे इतर असे काही जण दिल्लीगेट येथे सामलेटी यांना गाळा भाड्याने घ्यायचा असल्याने तो गाळा पाहण्यासाठी गेले होते. यावेळी गिरीश जाधवसह त्याचे इतर भाऊ व साथीदार तेथे आले. हे गाळे येथे कसे उभे केले. मला विचारल्याशिवाय मिळकतीत कोणत्याही प्रकारचे बांधकाम करायचे नाही. आमचा कोणीही माणूस येईल आणि हप्ता घेऊन जाईल. त्याची पूर्तता अगोदरच करून ठेवायची, असा दम दिला. सांगितलेला सल्ला ऐकणार नसाल तर तुला खोट्या गुन्ह्यात अडकवून तुझा कायमचा बंदोबस्त करू, अशी धमकी त्यांनी श्रीपाद छिंदम यांना दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार तोफखाना पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या