Ticker

6/Breaking/ticker-posts

'वर्क फ्रॉम होम' ठरतेय नाहक 'तापदायक'

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)


मुंबई : करोना महामारीतील निर्बंधांमुळे गेल्या दीड वर्षापासून अनेक कंपन्यांकडून ''वर्क फ्रॉम होम'चा अवलंब केला जात आहे. मात्र, घरी काम करताना तासन् तास एकाच जागेवर बसून राहणे अनेकांसाठी तापदायक ठरत असून, आरोग्याशी संबंधित तक्रारींत वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

'वर्क फ्रॉम होम'मुळे २५ ते ३० वयोगटातील तरुणांमध्ये भीती, हृदयविकारगुडघेदुघी, सांधेदुघी, पाठदुखी, मानदुखी, लठ्ठ्पणा ,डोकेखी यांसारख्या आजारांत वाढ झाली आहे. दवाखान्यात साधारणत: दहा ते बारा रुग्ण हे या आजारांशी संबंधित अन् 'वर्क फ्रॉम होम' असणारे असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. बैठी जीवनशैली अनेक आजारांना निमंत्रण देणारी ठरते. शारीरिक हालचालींचे प्रमाण कमी झाल्याने आरोग्याशी निगडित समस्या वाढतात. नोकरीनिमित्त ये-जा करताना काही प्रमाणात तरी हालचाली होत असताना करोना महामारीत अनेकांना 'वर्क फ्रॉम होम'मुळे घरूनच काम करावे लागत आहे. त्यामुळे मानसिक आजारांतही वाढ झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. ताणतणाव आणि नैराश्याचे प्रमाण वाढून घरगुती कलहाच्या तक्रारींत वाढ झाल्याचेही आढळून आले आहे.

कार्यालयात काम करताना योग्य आसनव्यवस्था केलेली असते. विविध कारणांनी शारीरिक हालचालीदेखील होतात. परंतु, घरून काम करताना बहुतांश वेळा स्वतःला एका खोलीत कोंडून घेत एकाच जागी बसून काम केले जाते. कामाच्या तासांमध्येही वाढ झालेली आहे. त्यामुळे आरोग्याशी निगडित समस्यांत वाढ होते. जास्त वेळेसाठी एकाच ठिकाणी बसून राहिल्याने लठ्ठपणाचा प्रश्न निर्माण होतो. लॉकडाउनमध्ये अधिक काळ घरी घालविल्यामुळे सांध्यांची हालचाल मंदावण्याची समस्याही उद्भवते. घरात बसल्याने वजन वाढणे, कमी जागेत हालचाल केल्यामुळे सांधे आखडण्याचे प्रमाण वाढणे, ऑफिसप्रमाणे टेबल-खुर्ची नसल्याने गुडघेदुखी होणे, मधुमेहाचा त्रास होणे आदी समस्या 'वर्क फ्रॉम होम' करणाऱ्यांत वाढल्याचे दिसून येत आहे.

अशी घ्यावी काळजी
*एका तासाहून अधिक वेळ बसून राहू नये. तासाभरानंतर थोडा वेळ चालावे.
*स्वत:ची कामे स्वत: करण्याचा प्रयत्न करावा.
*जेवणानंतर लगेचच कामाला बसू नये.
*दररोज व्यायाम करून वजन नियंत्रणात ठेवता येईल.
*संतुलित आहार घ्यावा.
*दीर्घकाळ उभे राहणे किंवा बसणे टाळावे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या