Ticker

6/Breaking/ticker-posts

सध्या ‘तो बाराचाच’ आकडा सर्वत्र दिसयोय; रोहित पवारांचा फडणवीसांना टोला

 


 लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

अहमदनगर : पेट्रोलवर लावण्यात येणाऱ्या करातून बारा रुपये पुन्हा राज्य सरकारला मिळत असल्याचे विरोधीपक्षनेते  देवेंद्र फड्णवीस यांचे विधान राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी खोडून काढले आहे. 'केंद्र सरकार पेट्रोलवर आकारत असलेल्या ३२.९० रुपया पैकी महाराष्ट्राला केवळ साडे तीन पैसे मिळतात. मात्र, विरोधकांना सध्या अधिवेशनातील तो बाराचाच आकडा सर्वत्र दिसत आहे,' असा टोला पवार यांनी लगावला आहे.

इंधन दरीवाढीचा मुद्दा सध्या गाजत आहे. इंधनावरील कर केंद्र सरकारने कमी करून दिलासा द्यावा, या मागणीसाठी काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांची आंदोलने सुरू आहेत. यावर पुण्यात बोलताना फडणवीस यांनी म्हटले होते की, 'इंधनाचे दर कमी होण्यासाठी राज्य सरकारने त्यांचे कर कमी करण्याची गरज आहे. केंद्र सरकार आकारत असलेल्या करातील १२ रुपये पुन्हा राज्य सरकारला मिळतात.' फडणवीस यांचा हा दावा खोटा असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. त्यांनी फडणवीस यांचा दावा करणारा व्हिडिओ आणि हा दावा खोटा ठरविणारा व्हिडिओ सोशल मीडियात पोस्ट केला आहे.

यामध्ये पवार यांनी फडणवीस यांचे नाव न घेता आरोप केला आहे. त्यांनी म्हटले आहे, 'खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ही भाजप नेत्यांची जुनी सवयच आहे. पेट्रोलवर लावण्यात येणाऱ्या करातले १२ रुपये राज्यांना मिळतात असं हास्यास्पद विधान भाजपकडून पुण्यात करण्यात आलं. देशात इतर कुठंही ही चलाखी चालून गेली असती पण महाराष्ट्रात नाही. केंद्र सरकार आकारत असलेल्या पेट्रोलवरील करात राज्याला किती पैसे मिळताततर केंद्र सरकार पेट्रोलवर आकारत असलेल्या ३२.९० रुपयांपैकी पैकी महाराष्ट्राला केवळ साडे तीन पैसे मिळतात. तरी केंद्र सरकारचे अपयश लपवण्यासाठी हे नेते मात्र राज्याला १२ रुपये मिळत असल्याचे सांगतात. विरोधकांना साडेतीन पैशाच्या ठिकाणी १२ रुपये दिसत असतील तर याला काय म्हणावंसगळीकडं अधिवेशनातील बाराचाच आकडा दिसत असेल तर त्याला इलाज नाही. दिवसाढवळ्या जेष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत असं धडधडीत खोटं बोलणं कुठल्याही नेतृत्वाला शोभणारं नाही,' असा टोलाही पवार यांनी लगावला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या