Ticker

6/Breaking/ticker-posts

विठ्ठल मंदिराचा होणार कायापालट ; आषाढीला मुख्यमंत्री करणार मोठी घोषणा?

 
लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 पंढरपूर: आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सपत्नीक पंढरपूर येथे येणार असून यावेळी मंदिराच्या आराखड्याबाबत मोठी घोषणा होण्याची अपेक्षा आहे. मंगळवारच्या बैठकीत संत नामदेव पायरी सुशोभीकरण आणि नवीन दुमजली दर्शन रांग करण्यावर चर्चा झाली असून मंदिराचा आराखडा आता ५५ कोटी रुपयांपर्यंत पोहचला आहे.

दरम्यान,  पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराला पुरातन रूप देण्याच्या दृष्टीने मंगळवारी झालेल्या बैठकीतही आराखड्याला अंतिम रूप देता आले नाही. मात्र विधान परिषदेच्या उपसभापती निलम गो-हे यांच्या उपस्थितीत आज दुपारी होणाऱ्या बैठकीत ठोस निर्णय होण्याची अपेक्षा आहे.  आम्ही नीलम गोऱ्हे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे निधीसाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती विठ्ठ्ल मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सपत्नीक पंढरपूर येथे येणार असून यावेळी मंदिराच्या आराखड्याबाबत मोठी घोषणा होण्याची अपेक्षा आहे. मंगळवारच्या बैठकीनंतर बोलताना गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत. आता आजच्या बैठकीत मंदिराच्या आराखड्याला अंतिम स्वरूप दिले जाणार असून त्यानंतर पुरातत्व विभागाकडून हिरवा कंदील मिळाल्यावर राज्याच्या विधी व न्याय विभागाकडे हा आराखडा मंजुरीसाठी दिला जाणार आहे.

आराखड्यामध्ये गेल्या काही वर्षांपूर्वी नूतनीकरण झालेल्या नामदेव पायरीबाबत तीन वेगवेगळ्या मॉडेलवर चर्चा झाली आहे. याशिवाय दर्शन मंडपातून विठ्ठल मंदिरावर येणारी रांग मंदिराबाहेरून आणि मंदिराच्या भिंतीला स्पर्श न करता असावी याबाबत चर्चा झाली. सध्याच्या दर्शन रांगेमुळे मंदिराच्या भिंतीला भविष्यात धोका पोहचू शकणार असल्याने आता मंदिराच्या बाहेरच्या बाजूने स्टिलचा वापर करून दोन मजली दर्शन रांग उभारण्याबाबत चर्चा झाली आहे. यामुळे आराखड्यात १५ कोटी रुपयांची वाढ झाल्याचे गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या